सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? जीवनरंग ❤️

☆ सदमा.. . भाग  4 ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

सार बरं चालल होत. हे ही नियतीला बघवले नाही. ऐके दिवशी भानुदास डोके धरून घरी आला. फार अस्वस्थ होता. दवाखान्यात नेहले औषधपाणी केले. पण गुण येईना. वेगवेगळ्या चाचण्या केल्या शंभर उपचार झाले. शेवटी निदान कॅन्सरचे आले. बघता बघता माणुस अंथरूणावर खिळला. त्यांची सेवा केली. अखेर तो गेला. दु:खाचा डोंगर कोसळला ,खेळ मांडण्या आधी विस्कटला,त्यांचे आजार पण सासरच्या लोकांनी लपवले वर हिलाच पांढऱ्या पायाची ठरवले. आता पोरगी हाच एक धागा उरला. यावर उभे आयुष्य काढावे लागणार. ही बातमी समजल्यावर आई-वडील आले यांनी सासरच्या मंडळींना जाब विचारला. पैश्या कमी नव्हते पण आता बाबांना विश्वास नव्हता. त्यानी भांडण काढून पोरीला आणले. परीत रमली सावरली,पुढच्या शिक्षणासाठी अॅडमिशन घेतली. नवऱ्याच्या फंडाची,विम्याची रक्कम मिळाली. तिने ते पैसे बाबांना दिले त्यातून नवीन घर बांधायला लावले. परी आता शाळेला जायला लागली. ही मन रमवण्यासाठी जाॅब करत होती. हे ही सुख नियतीला बघवले नाही. हसती खेळती परी अल्पशा आजाराने गेली तेव्हा खरी ती तुटली. अशी तुटली की पुन्हा जोडण्याची, उभारण्याची तिची इच्छा नाही. मनाच्या पार चिंध्या झाल्या. त्या शिवता येणार नाहीत. मी खुप आशेने आले आहे. माझ्या मैत्रीणीच दान माझ्या पदरात घालाल.”

“या जगात अशक्य काही नाही. प्रयत्न करण्यांची तयारी हवी. येवढे आघात लहान वयात सहनकरणं सोपे नाही. यासाठीच लग्न करताना घाई करू नये. इथं मुलीची परिपक्वता महत्त्वाची. आता कोण बरोबर कोण चूक हे बघण्यात अर्थ नाही. यातून मार्ग काय काढता येईल हे पाहणे महत्त्वाचे. तुझे पहिले अभिनंदन करते. ही केस योग्य ठिकाणी आणलीस या बद्दल. आज होत काय, लोक शरीराच्या आजारांवर औषधपाणी करतात,तो आजार मानतात पण मनाचं काय ?हा आजार आहे हे मान्य करत नाहीत. मग कुठे देवदेव करत बसतात,कुठे हलक्या डोक्याची ठरवतात,उतारे धुपारे करतात. एक जीव बरबाद करून सोडतात. स्वत: बदलत नाहीत दुसऱ्याला बदलू देत नाहीत. योग्य औषधाने हे आजार बरे होतात. प्रथम तिच्या आई-वडिलांना घेऊन ये. मी बोलते त्यांच्याशी त्यांची साथ महत्त्वाची आहे. नंतर दोन दिवसांनी मैत्रीणीला भेटते. “

दिपाने विजूच्या आई-वडिलांना  मानसोपचारतज्ज्ञाकडे नेहले. तिचे समुपदेशन केले. मैत्रीणी ट्रिटमेंट सुरू झाली. तिला औषध दिले.

दिपाने आईला सांगितले मी जाते आता हिची खुशाली कळवा

वर्षे झाले असेल,आईचे पत्र आले होते. शेवटच्या दोन ओळी ती पुन्हा पुन्हा वाचत होती” विजूने परवा भिंतीवर चित्रे काढीली ती रंगवली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती नाटक बघायला  पण ग

– समाप्त – 

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments