श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
☆ जीवनरंग : लघुकथा – वडिलोपार्जित धन (भावानुवाद) ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
मरणशय्येवर वडील निजलेले होते. समोर त्यांचा लाडका पुत्र. वडिलांना काही तरी सांगायचं होतं. मुलगा त्यांची मनोव्यथा जाणून घ्यायला आतूर झाला होता. वडिलांनी स्पष्टपणे सांगितलं, ‘बाळा, ह्या घराशिवाय माझ्या पाशी काही नाही. जे होतं ते तुला वाढवण्यात आणि तुझ्या शिक्षणात मी खर्च केलं. मला अभिमान वाटतोय की माझा मुलगा परदेशातल्या एका
कंपनीत चांगल्या पोस्टवर काम करतो आहे. माझं जे काही आहे ते ह्या कपाटात ठेवलं आहे.
मुलाला आश्चर्य वाटलं. लोक मूल्यवान गोष्टी बँकेच्या लाँकरमध्ये किंवा तिजोरी मध्ये ठेवतात. मुलाच्या शंकेखोर चेहऱ्याकडे बघून त्या लेखक वडिलांनी सत्य सांगितलं.’बाळा,ह्या कपाटात माझी प्रकाशित पुस्तकं,अप्रकाशित लेखन, वाचकांची खुशी पत्र आणि काही स्मृती चिन्हं आहेत. बास. एव्हढीच माझी पुंजी आहे. ती तुझ्याकडे सुपूर्द करतो.’
मुलाला ठाऊक होतं, वडिलांनी जन्मभर साहित्य साधना केली होती. म्हणूनच तो अभिमानाने म्हणाला, ‘बाबा, ह्या घरात मी साहित्यसंग्रहालय काढीन, तुमचं अप्रकाशित लेखन मी प्रकाशकांकडे पाठवीन, सगळ्या प्रशस्तीपत्रांचा एक अल्बम बनवीन, तुमचे पुरस्कार आणि स्मृती चिन्हं म्हणजे तर आपल्या घराण्याची अनामत ठेव होईल. कारण हे माझं वंश पारंपरिक धन आहे.’
खूप वेदना होत असतानाही वडिलांच्या डोळ्यांत आनंदाची चमक आली.
मूळ हिंदी लघुकथा-‘विरासत’ – लेखक – श्री सेवा सदन प्रसाद, खारघर, नवी मुंबई
मो. 9619025094.
मराठी अनुवाद – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
मो. – 8806955070.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈