श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ जीवनरंग : निष्ठा..अनुवादित कथा.. ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
आपल्या समाजसेवा अरणार्या पत्नीमुळे पतीदेव जाम वैतागले होते. वेळी-अवेळी ऑफीसमधून घरी यायचे, तर घराला आपलं कुलूप. किती तरी वेळा घराला कुलूप असल्यामुळे मित्रांच्या समोर त्यांना लज्जित व्हावं लागलं होतं. एके दिवशी अगदी दृढपणेत्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं , ‘समाजसेवेच्या निमित्ताने कुठे कुठे भटकत असतेस कुणास ठाऊक? आजपासून तुझं घराबाहेर जाणं बंद.’
पत्नीने कुठल्याही प्रकारे वाद न घालता मान हलवून मूक संमती दिली. दोन – तीन दिवसांनंतर एकदा त्यांची सेक्रेटरी कुठल्या तरी गाण्याच्या धूनवर मान हलवताना त्यांना दिसली. त्यांना एकदम पत्नीच्या मौन स्वीकृतीची आठवण झाली.. तत्काल त्यांनी काम थांबवलं आणि खरं काय आहे, ते जाणून घेण्यासाठी ते अचानक घरी आले.
घरात त्यांना जे दिसलं, ते पाहून त्यांचे डोळे जसे फाटलेच. घरात पाच – सहा गरिबाची, फाटक्या-तुटक्या कपड्यातील घाणेरडी वाटणारी मुले पाटी आणि पेन्सील घेऊन बसली होती. त्यांची पत्नी त्यांना आकडे मोजायला शिकवत होती आणि ती मुले तन्मयतेने शिकत होती.
मूल कथा – निष्ठा मूळ – लेखिका – हंसा दीप
1512-17 Anndale Drive, North York, Toronto, ON-M2N2W7 Canada
+647 213 1817
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈