सौ. नीलम माणगावे
☆ आत्मसाक्षात्कार – स्वतः स्वतःची घेतलेली मुलाखत – भाग – 1 ☆ सौ. नीलम माणगावे ☆
हाय नीलम,कशी आहेस?
कशी असणार? कोरोनाचा विळखा आवळत चाललाय. वर्षभरापासून हे चालूच आहे. त्यात लॉक डाऊन ची साखळी आहेच. कुठले का चर्यक्रम होत नाहीत. मैत्रिणी भेटत नाहीत. मित्रांशी संपर्क होत नाही… तसं ऑनलाईन सगळं चालू आहे. पण त्यात मजा नाही.
सगळं कधी संपेल असं झालंय..
मग तू असं का समजत नाहीस, की लेखनाच्या दृष्टीने ही एक सुवर्णसंधी आहे. त्याचा उपयोग करून घ्यायला हवा. बरं, वर्षभरात काही नवीन लिहिलंस की नाही?
तू काय माझी मुलाखत घेत आहेस?
हवं तर तसं समज.. काय लिहिलंस नवीन?
लिहिलं ना, दोन कादंबऱ्या लिहिल्या. कोरोना संदर्भात एका लहान मुलीचे मनोगत लिहिले.
अरे व्वा! मग तर आनंद व्हायला हवा तुला. बरं, नाव काय कादंबऱ्यांचं?
एका कादंबरी आहे ‘भैरवायन’.. दुसरी आहे,’साईड इफेक्टस्’.. आणि बालसाहित्याचं नाव आहे,’ठकी, मी आणि कोरोना’..
नावं तर अर्थपूर्ण आहेत. कादंबऱ्या कुठल्या विषयाच्या आहेत?
दोन्ही कादंबऱ्या ग्रामीण आहेत. भैरवायन.. आहे ती, स्वातंत्र्यपूर्व काळापासून आज पर्यंतचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक होणारे बदल टिपणारी आहे. आणि साईड इफेक्टस्.. ही कादंबरी लैंगिक शोषणाचे साईड इफेक्टस् दाखवते. पण इथं लैंगिक शोषण पुरुषांनी केलेले नाही तर स्त्रियाच एका पुरुषा मागे लागतात. त्या का लागतात? याचा शोध आणि त्याचे होणारे दुष्परिणाम.. गावाला कसे भोगावे लागतात? याचं ते चित्रण आहे.
खूप वेगळा विषय आहे हा.. अशी कादंबरी वाचनात आलेली नाही.
तुझ्या वाचण्यात आली नसेल.. तसंही आपण सगळंच कुठे वाचतो?
तेही खरंच आहे म्हणा.. आता म साला सांग, लिहिण्याची सुरुवात कधी केलीस तू?
सांगायलाच हवं का?
हो. मला आवडेल ऐकायला.
बरं ऐक मग, सांगते…
क्रमशः …
© सुश्री नीलम माणगावे
जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर
मो 9421200421
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈