सुश्री वसुधा गाडगिल
☆ जीवनरंग : मोर्चा – सुश्री वसुधा गाडगिल ☆
” घे, ही भाकर खा … ” भाकरीचा तुकडा त्या माणसाच्या तोंडाजवळ नेत बाई त्याला म्हणाली.
बाईचा हात झटकून तो चिडून ओरडला
” कसला वेडेपणा चालवला आहे!”
तेवढ्यात सर्व बायकांनी चारीबाजूने त्याला घेरले. काहींनी मागून शर्ट धरला , एकीने समोरून शर्टचा कॉलर पकडला. दोघीतिघींनी त्याला धरले आणि ओरडल्या
” आमच रेशन खाल्ल ना ! आता भाकर खा ! ”
तो सर्व बायांच्या वेढाखाली अडकला.अखेरीस एका बाईने त्याला भाकर दिली, भाकरी खाल्ल्याबरोबर त्याने ती थूsss करून थुंकली. तेवढ्यात बायकांनी वाघिणींसारखी गर्जना केली.. ….
“आमचा वाटच रेशन बळकवण्यात काही लाज नाही वाटली आणि आमच्या घरातली भाकरी थुंकतो आहेस!”
“मी …. मी नाही … मोठ्या साहेब लोकांनी तुमच्या भाकरीची कणिक.. …” म्हणत त्याची जीभ पडायला लागली.
“कान धर, आता आम्हाला उत्तम रेशन देणार की नाही !”
फूड ऑफिसरने स्वताचे कान धरून ग्रामीण महिलांची माफी मागीतली . नऊवारी नेसलेल्या खेड्यातील महिलांचा “हल्ला बोल” मोर्चा यशस्वी झाला होता !
© डॉ. वसुधा गाडगीळ
संपर्क – डॉ. वसुधा गाडगिल , वैभव अपार्टमेंट जी – १ , उत्कर्ष बगीचे के पास , ६९ , लोकमान्य नगर , इंदौर – ४५२००९. मध्य प्रदेश.
मोबाईल – 9406852480
साहसपूर्ण रचना
सुस्वागतम् आणि अभिनंदन.
????मस्त.