श्रीमती माया सुरेश महाजन

परिचय 

एम. ए – इंग्रजी, एम. ए. अर्थशास्त्र बी.एड.

हायस्कूल क्लासेस अध्यापिका, कोचिंग क्लासेसमध्ये इंग्लिश बरोबरच कॉर्मसचेही अध्यापन.

वाचन, लेखन, गायन, वत्तृत्व, अभिनय या क्षेत्रांत आवड व सहभाग ज्यासाठी अनेक बक्षिसे.

आकाशवाणी दिल्ली, पणजी (गोवा) औरंगाबाद येथे विविध कार्यक्रमात सहभाग, अयोजन, लेखन, सादरीकरण, ‘साहित्य संपदा’ कार्यक्रमात काव्यवाचन व मुलाखत.

गेल्या काही वर्षांपासून स्वतंत्र लेखनाबरोबरच अनुवाद क्षेत्रात कार्यरत दै. वर्तमानपत्रे आणि मासिकांमधून ललित लेखन, प्रासंगिक, व्यक्ति परिचय, पुस्तक परिचय, कविता प्रकाशित.

स्वलिखित कविता व लेखांवर आधारित कार्यक्रम ‘शब्द सूरांच्या गाठीभेटी’ चे पंधरावर प्रयोग.

‘मंगळागौरीचा जागर’ या कार्यक्रमासाठी सूत्र संचालन व लेखन 150 वर प्रयोग, स्टार-प्रवाह वाहिनीतर्फे कार्यक्रमास प्रथम क्रमांक व इतर ठिकाणीही बक्षिसे.

पहिल्या ‘मराठवाडा लेखिका साहित्य सम्मेलनात’ काव्यवाचन.

उस्मानाबाद येथे मराठवाडा लेखिका साहित्य सम्मेलनात सन्मान.

पहिल्याच अनुवादित पुस्तकाला (माध्यम) केंद्रिय हिंदी निदेशालयाचा उत्कृष्ट अनुवादाचा  (रु. एक लाख) पुरस्कार ज्यासाठी सह्याद्री वाहिनी (मुंबई) व औरंगाबाद दुरदर्शनवर मुलाखत.

☆ जीवनरंग  ☆ सुनमुख श्रीमती माया सुरेश महाजन 

मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. दुसर्‍या दिवशी लक्ष्मीपूजन आणि सुनमुख पहाण्याचा कार्यक्रम होणार होता. सगळ्या नातेवाईकांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. की सासूबाई सुनमुख पाहाण्यासाठी आपल्या सुनेला काय देतील?

सुनबाई जेव्हा तयार होऊन आली आणि सासूबाईंच्या पाया पडली, तेव्हा सासूबाईंनी मस्तकावर आशीर्वादाचा हात ठेवला; नंतर विचारले, ‘‘सुनबाई, तुला काय हवे?’’

‘‘सुनबाई, आज तर तुझा हक्काचा दिवस आहे. चांगले छान जडावाचे तोडे मागून घे.’’ एका नातेवाईकाने सुचविले.

‘‘अरे नाही, हिर्‍याचे नेकलेस मागून घे.’’ दुसर्‍याने सांगितले, थट्टा मस्करी सुरू झाली. तिसर्‍याने म्हटले, स्वत:साठी गाडी मागून घ्या. नवरीदेखील इतरांबरोबर मंद स्मित करत होती आणि सासूसुद्धा पण सासूच्या मनात मात्र धडधड सुरू झाली की नातेवाईकांच्या सांगण्यावरून सून खरोखरीच एखादी अशी मागणी न करो जी आपल्याला पूर्ण करता येणार नाही. मग सासुने म्हटले, ‘‘हं सुनबाई, बोल, काय हवं तुला?’’

‘सासुबाई नव्हे आई! मी खूप लहान असतानाच माझे वडील वारले. वडिलांचे प्रेम काय असते ते कधी अनुभवलेच नाही. आईनेच आम्हा दोघी बहिणींचे पालन-पोषण केले, मोठे केले. माझी अशी इच्छा आहे की, तुमचा आशीर्वाद आणि प्रेमासोबतच मला मामंजीचे नव्हे,  बाबांचेही प्रेम मिळावे, जेणेकरुन मला वडिलांच्या प्रेमाची अनुभूती येईल. आणखी काही नको मला!’ सुनेनं मोठ्या विनम्रतेने म्हटले. सगळ्या नातेवाईकांच्या नजरेत सुनेबद्दल स्तुतीचे भाव दिसू लागले. सासुने सुनेच्या डोक्यावरून हात फिरवला, तिच्या मस्तकाचे चुंबन घेतले आणि तिला आपल्या मिठीत घेतले.

 

मूळ हिंदी कथा – मुंह दिखाई  – सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा

मो.- ९३२५२६१०७९

अनुवाद – सुश्री माया सुरेश महाजन 

मो.-९८५०५६६४४२

– श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

अनपेक्षित धक्का देणारी कथा.