सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
☆ पुस्तकावर बोलू काही ☆ कुत्रा छंद नव्हे संगत – भाग-3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
छंद नव्हे संगत पुस्तकाचे अंतरंग भाग ३
पुस्तकाच्या शेवटी एक श्वानधर्माचे उदाहरण वाचताना खरोखरच अचंबा वाटतो. ती गोष्ट
अरुणाचल प्रदेश ते काराकोरम खिंड हे आठ हजार कि.मि. अंतर पार करण्यात सेनादलातील तीन अधिकाऱ्यांना कुत्र्याने कशी साथ दिली! गिर्यारोहण चालू झाले. भूतानमधील डोंगररांग दरीतून जाताना मॅस्टिफ जातीचे कुत्र्याचे पिल्लू त्यांच्या मागे लागले. दया आली आणि अधिकाऱ्याने त्याला आपल्या बरोबर घेतले त्याचे नाव द्रुग, (घोडेस्वार) ठेवले गेले. सिक्कीम मधून जाताना द्रुग वेगळ्या मार्गाने पळत जायला लागला. आणि बर्फ उकरायला लागला. पाहिले तर एका माणसाचे प्रेत होते. अधिकाऱ्यांनी हात जोडून पुन्हा त्यावर बर्फ टाकला. पुढे प्रवास गौरी शंकरच्या बेस कॅम्प जवळून २१ हजार फूट उंचीवरून झाला. नेपाळ पार करून कुमाउला पोहोचले. जानेवारी ते नोव्हेंबर त्यांचा प्रवास द्रुगच्या सहवासात आनंदात झाला.
शां. ना. दाते यांच्याकडे श्वान विश्वकोश आहे. कोणत्याही जातीच्या कुत्र्या बद्दल त्याच्या सर्व गुणधर्मांसह संपूर्ण माहिती ते क्षणात देत असत. त्यांचा 50 वर्षांचा परिचय व इतिहास आहे. त्यांच्या परिश्रमाचे आणि तपश्चर्येचे मूर्त रूप हे पुस्तक आहे.
कुत्र्याला बघून पळून जाणारी माणसे हे पुस्तक वाचून कुत्रा पाळण्याचा विचार करू लागले. आणि अनेकांनी प्रत्यक्षात आणले ही. आज दाते हयात नाहीत. पण त्यांचे ९६ पानांचे पुस्तक या रूपाने अमर आहेत.
समाप्त
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈