श्री अ. ल. देशपांडे
प्रतिमेच्या पलिकडले
☆ ‘ताटाळं…’ ☆ श्री अ. ल. देशपांडे ☆
ताटाळं. सुधारणेच्या नावाखाली हे ताटाळं जमीनीवर आलं. सिमेंटच्या भिंती उभ्या राहिल्या. भांडी ठेवण्याचे सेल्फ आलेत. गिरमिटाने भिंतीला भोकं पाडण्यात आली. लांब खिळे स्थानापन्न झाले. त्यावर सेल्फ टांगल्या गेलेत. स्टेनलेस स्टीलची चकचकीत भांडी त्यात ओळीने विराजमान झालीत.
ताटाळं अडगळीत गेलं. दुर्लक्षित झालं. त्याची रया गेली. हळूहळू मोडतोड झाली. त्याला योग्य जागा न मिळाल्याने आबाळ झाली.
ते नकोसे झालेच होते. त्याची मोडीची किंमत घरच्यांना खुणाऊ लागली.
एके दिवशी रोजच ऐकू येणारी हाळी (आरोळी) ” है क्या जूना पुराना सामान ? ” जरा जास्तच जोराने कानावर पडली. घरच्यांनी कान टवकारले.
अनेक वर्षं ताटं,पळ्या,चमचे ,डाव पोटात सामावून घेणारं ताटाळं अलगद भंगार वाल्यांच्या पोत्यात विसावलं.
घरातील एकेकाळची ही नकोशी वाटणारी अडगळ आता आपल्याला समृद्ध अडगळ वाटू लागली आहे.
कालाय तस्मै नमः॥
© श्री अ. ल. देशपांडे
अमरावती
मो. 92257 05884
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈