श्री आशिष बिवलकर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “तुझ्याविना…” ☆ श्री आशिष बिवलकर ☆
☆
तुझ्याविना…..
जीवन पुढे खूप आहे… पण तूझ्या विना जगण्याचा यक्ष प्रश्न आहे.. रडून रडून किती दिवस रडणार… आता अश्रू ही सुकले आहेत कारण तो /ती गेली आहे पण उरल्या संसाराच्या जवाबदाऱ्या तिला /त्याला पार पाडायाच्या आहेत…
आयुष्य किती शिल्लक आहे यांची माहित नाही.. जुन्या आठवणीत रमलो /रमले तर वर्तमान कठीण आहे.. वर्तमाना अस्तित्व नष्ट करेल… अस्तित्वाची लढाई एकट्याने लढायची आहे
आयुष्यात पुढे काय ताट वाढल आहे.. काय आव्हान आहेत.. ते सर्व अनामिक आणि खडतर असणार पण जीवन गाडं दुःखच्या चिखलात रुतले तरी ते आपल्याच प्रयत्नांनी बाहेर काढायचा आहे…. काळ लोटायचा आहे…
जो वर तो / ती सोबत होती… त्याच्या संगतीचा उजेड होता तेव्हा त्या उजेडाची किमंत कळली नाही पण अचानक तो उजेड गेला आणि पायाशी अंधार दाटलाय… चाचपडत चाचपडत पुढे जात ध्येय गाठणे हेच प्रारब्ध आहे…
जोवर सोबत.. सहवास होता तो वर ती सुखसुमने होती पण त्या सुख
सुमनांची आता निर्माल्य झाली आहेत.. त्या सुख सुमनांचा गंध आता हरवला आहे…. एखादी वाऱ्या
ची झुळूक आली तरी त्या तरल.. हलक्या फुलक्या आठवणी आत आठवून कसं चालेल… आये है दुनिया में तो जीना ही पडेगा…
जोवर श्वास चालू आहे तो पर्यंत जगण्याची धडपड, इच्छा शक्ती ठेवायची आहे.. आव्हानावर मात करायची आहेत… कर्तव्य ती पार पाडायची आहेत… पण जेव्हा धडधड थांबेल तेव्हा त्या सावलीला मला अर्ध्या वाटेवर का सोडून गेलीस /गेलास हा प्रश्न विचारायला गाठायाचं आहेत… भेटायच हा शब्द मुद्दामहून टाळला आहे.. कारण त्याच्या/तिच्या नंतर जगाचा सामाना त्याला /तिला करायचा आहे…
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈