डॉ.सोनिया कस्तुरे

??

☆ मातृदिनामित्त : ‘आई‘ म्हणजे…  डॉ.सोनिया कस्तुरे ☆

प्रत्येक माणसात आईपण येवो 

         आणि

 हे जग आणखी सुंदर होवो.

 

   निर्हेतूक, निर्व्याज, निरपेक्ष प्रेम म्हणजे आई.. ! 

  आई होणं म्हणजे मानवतेची सर्वोच्च उंची गाठणं.. !

  आई म्हणजे वात्सल्यपुर्ण पालकत्व

  आई म्हणजे समंजस स्वीकार आणि शहाणपण

   आई म्हणजे कष्ट, सहनशीलता, समर्पण, वेदना संवेदनांची नेणिवेत गेलेली जाणिव..

   आई म्हणजे खूप काही न संपणार, न आटणार, सांगता न येणारं..

   आई म्हणजे विशालत्व

       केवळ जन्म देते तिच आई असते असे नाही. आई कोणीही होऊ शकते.

      प्रेम आणि करुणेने भरलेले हृदय ज्याच्याकडे आहे ते कुणीही आई होऊ शकतात.

    स्त्री-पुरुष दोघातही आईपण असतेच.

पुरुषाने स्वतःतील आईपण उदयास येऊ द्यावे.. ! ज्याचा त्याला स्वतःला आणि सगळ्या कुटुंबाला, समाजाला फायदा होईल

      

  जेव्हा सगळ्यांना माणूसपणा सोबत आईपण अनुभवता येईल तेव्हा जग सुखी होईल.. !

   आईच्या शारीरिक मानसिक आरोग्यावर कुटुंबाचे आरोग्य अवलंबून असते  हे विसरुन चालणार नाही.

     मातृदिनाच्या खूप शुभेच्छा ! 

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments