☆ मनमंजुषेतून ☆ जीवन गाणे – भाग 5 ☆ सौ. अंजली गोखले ☆
संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की मोठ्या कंपन्यांमध्ये वरिष्ठ आणि जबाबदारीच्या पदांसाठी साठीच्या पुढच्या मंडळींना प्राधान्य देतात. कारण त्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता जबरदस्त असते. त्यांचे कौटुंबिक पाश बऱ्यापैकी झालेले असतात, काम करण्याची इच्छाशक्ती असते, क्षमतेमध्ये ते कमी पडत नाहीत. अमेरिकेमध्ये संशोधन करून प्रयोगांती असे सिद्ध केले आहे की माणसाचे सर्वात कार्यक्षम वय 60 ते 70 आहे. आहे की नाही आश्चर्यकारक!त्यांच्यामध्ये सत्तरी पर्यंतच्या लोकांचा नंबर काम करण्याच्या बाबतीत पहिला. त्यानंतर सत्तर ते ऐंशी वयाचे लोक व्यवस्थित कार्यक्षम!त्यानंतर चा नंबर लागतो 50 ते 60 वयाचा. विशेष म्हणजे नोबेल पदक विजेत्यांचे सरासरी आयुर्मान 62 वर्षे दिसून आले आहे. अमेरिकेतल्या मोठाल्या शंभर चर्चेस मध्ये काम करणाऱ्या धर्मोपदेशक यांचे वय तपासले असता बहात्तर वर्षापर्यंत हे लोक व्यवस्थित काम करू शकतात असे आढळून आले. पोपचेसरासरी वय 76 दिसून आले. यावरून एवढाच निष्कर्ष निघू शकतो की परमेश्वर यांनी हे जे शरीर बहाल केले आहे, त्याची सर्वात चांगल्यात चांगली वर्षे कोणती म्हणाले तर साठी पासून सत्तरी पर्यंत!या वयामध्ये आयुष्यातले चांगले तुम्ही मिळवु शकता.
यावरून आपण हे नक्की समजून घेतले पाहिजे ही सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनो, वाढत्या वयाची चिंता करू नका, योग्य नियोजन करून कार्यरत रहा, अच्छा ही बना, आनंदात रहा. मग संध्याछाया का बर भिववतील ?याच वयामध्ये आयुष्याचा खरा अर्थ समजलेला असतो, दिशा तर आता ठरलेलीच असते, त्यामुळे मागे अजिबात न वळून बघता पुढे पुढे चालत रहा. या वाटेवर काही झाडे उन्मळून पडणारच, आधारचे हात कमी होणारच, शरीराला_ मनाला वेदना या होणारच. पण या सर्वांवर मात करून जीवन गाणे गात राहिले पाहिजे. आकाशातील ढग, पाऊस बरसून आपले पूर्ण आयुष्य रिते करतो, नद्या सतत वहाततेच पाणी किनाऱ्याला देत राहतात, सागर त्याच पाण्याची वाफ करून पुन्हा ढगांना पाणी भरण्याची संधी देतो. झाडे आपले पूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठी वेचतात, गोड गोड फळे माझी म्हणून त्यांना खाताना आपण कधी पाहतो का?ही सगळी रंगीत सुवासिक फुले माझेच आहेत असे ते कधी म्हणतात का?दुःखाने टाहो फोडताना, अपयशाने खचून जाताना रडत रडत जीवन जगणारी झाडे आपण कधी पाहतो का?मग या सुंदर अश्या निसर्गाकडून आपण हेच शिकूया आणि आपल्याबरोबर इतरांचे आयुष्य ही आनंदी बनवूया. बालपण तरुणपण वृद्धावस्था आपल्याला मिळालेली वरदा नं आहेत. त्या त्या वयात, त्या त्या क्षणात, त्यांचा आनंद मिळवू या मग कुठल्याही वयामध्ये आपल्या ओठी याच येतील
“जीवनात ही घडी
© सौ. अंजली गोखले
मो ८४८२९३९०११
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈