सुश्री सुनीला वैशंपायन
मनमंजुषेतून
☆ म्हणून काय झाले… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆
आम्ही अजूनही मस्ती करतो
एकमेकांची खेचत असतो
मस्त शाब्दिक गुदगुल्या करतो
सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले ……
आजही आम्ही मस्त नट तो
खूप खूप shopping करतो
खादाडी पण करत राहतो
सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले . ….
आम्ही यथेच्छ रुसत असतो
रागाने धुसमुसत राहतो
पण लगेच छान हसून घेतो
सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले……
परदेश वाऱ्या करत असतो
देशातही मस्त फिरत असतो
नव नवीन ठिकाणे पालथी घालतो
सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले ……
छान छान साडी नेसून मिरवतो
पंजाबी ड्रेस ची ही मजा घेतो
जीन्स पँट ही आपल्याशा करतो
सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले ……
आंबट चिंबट जोक ऐकत असतो
मनसोक्त खिदळत असतो
पण कधीतरी एकदम गंभीर होतो
सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले ……
देवदर्शन करत असतो
निसर्ग दर्शन पण करत राहतो
मनःस्वास्थ्य टिकवून ठेवतो
सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले ……
टीव्ही यूट्यूब शी नाते जोडतो
अवतीभवती चे जग जाणून घेतो
स्वतः च त्यातून काही बोध घेतो
सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले ….. .
Get together करत असतो
मस्त गप्पा झोडत असतो
प्रत्येकाचे अनुभव share करतो
सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले ……
गोड गाणे गुणगुणत असतो
उडत्या गाण्यावर बसूनच थिरकत असतो
मौज मस्ती करत राहतो
सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले …. .
कधी कधी मुखवटे लावून जगत असतो
जग रहाटी चा मान राखत असतो
देवाण घेवाण करून सुखावत असतो
सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले ……
Morning walk करत रहातो
Sports shoes चे सुख अनुभवतो
कित्ती स्टेप्स चाललो ते मोजत राहतो
सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले ……
Laptop, Tab शी मैत्री करतो
स्मार्टफोनशी हितगुज करतो
एकमेकामधील अंतर कमी करतो
सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले ……
कडू गोळ्या औषधाच्या गिळत असतो
पण गोड आठवणी मनात घोळवत असतो
त्याच शिदोरीवर जीवन आनंददायी बनवतो
सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले ……
कवयित्री- अज्ञात
प्रस्तुती : सुनीला वैशंपायन