सौ. अमृता देशपांडे
☆ मनमंजुषेतून ☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 3☆ सौ. अमृता देशपांडे ☆
मी केवढी भाग्यवान कि, प्राध्यापक श्री पां.ना. कुलकर्णी हे स्वतः ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक, विवेचक, प्रवचनकार, मला हा विषय शिकवत होते. त्या वर्षी मराठी विषयाची मी एकटीच विद्यार्थिनी होते. अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन,रसाळ वाणी, आणि ओघवतं वक्तृत्व अशा मार्गदर्शनात मी अभ्यास करत होते. वेगवेगळ्या असंख्य नोट्स लिहून तयार करत होते. सरांच्या कडून तपासून घेत होते.
वर्ष संपत आलं होतं. परीक्षेची वेळ आली. मी विट्ठलाचीच प्रार्थना्थ करत होते, ” मला पेपर लिहिताना सगळं आठवू दे आणि लिहायला येऊ दे.” परीक्षा झाली. आणि सरांनी मला सांगितलं, ‘ तुमच्या सर्व नोट्स मला आणून द्या’. मी सगळ्या व्यवस्थित एकत्र केल्या आणि दिल्या. त्यांनी त्या शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या विभागात संदर्भ वाचन आणि अभ्यासासाठी दिल्या. मला खूप खूप खूप आनंद झाला. विद्यापीठाते आपलं लेखन संदर्भा साठी असणं ही किती अभिमानाची गोष्ट. असं असेल,हे कधी माझ्या स्वप्नातही वाटलं नव्हतं. तेव्हा पटलं, संपूर्णं वर्षभर विठ्ठलच तर माझ्या कडून लिहून घेत नसेल?
तेव्हा पासून मला सतत वाटायचं, पंढरपूर ला विठ्ठलाच्या दर्शनाला मला कधी जायला मिळेल? ही 1978 सालची गोष्ट. लगेचच प्रपंचात पडले. नशिबात पुढे काय वाढून ठेवलेले असते, काही कळत नाही. सुखदुःख, त्रास, अडचणी यांच्याशी दोन हात करता करता 40 वर्षे गेली. वयाची साठी ओलांडली. दरवर्षी आषाढी, कार्तिकी एकादशीला उपवास करण्याइतकाच विठ्ठलाशी संबंध उरला होता.
आणि….अचानक ओळखीच्या मित्र मैत्रिणींचा अक्कलकोट, तुळजापूर, कोल्हापूरला जायचा बेत ठरला. डिसेंबर 2019, आम्ही प्रवास सुरू केला. अक्कलकोट ला श्री स्वामी समर्थांचे दर्शन, महाप्रसाद घेऊन दुसरे दिवशी सकाळी मार्गस्थ झालो. वाटेत तुळजापूर च्या आधी पंढरपूर ला जाऊ असे ठरले. आणि दोन तासात पंढरपूर ला पोचलो सुद्धा.
© सौ अमृता देशपांडे
पर्वरी- गोवा
9822176170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈