सौ. अमृता देशपांडे
☆ मनमंजुषेतून ☆2020 – 2021 – हरवलं….गवसल…. ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
2020….. या वर्षी हरवले:
खूप जवळची माणसे, मनःशांती, मुक्त वावर, मंदिरातून देवदर्शन, प्रवास, भेटीगाठी, असं खूप खूप..
हाती राहिलं:
भीती, सावधपणा, अलिप्तता, उदासी.
हरवलेलं मिळालं:
- -स्वच्छतेचे, आत्मनिर्भरतेचे आणि कुटुंब व्यवस्थेवर ठाम उभ्या असलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीचे आचारविचारांचे संस्कार.
- आपल्यातलेच हरवलेले, विसरलेले, दुर्लक्षित केलेले कलागुण .
नवीन मिळालं:
विश्वासाठी प्रार्थना करण्याची इच्छा, रक्ताच्या एका थेंबाची किंमत, एका श्वासाची किंमत, आणि आपल्या माणसाच्या अस्तित्वाची किंमत आणि अनमोल असा ई-अभिव्यक्ती चा सहवास.
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. संपादक मंडळाचे आभार.
सर्व लेखक- लेखिका, कवी- कवयित्री ना 2021 च्या शुभेच्छा!
2021 सर्वांना मनसोक्त लेखनाचे, आनंदाचे, आरोग्याचे व सुरक्षिततेचे असो. हीच सदिच्छा!!
© सौ अमृता देशपांडे
पर्वरी- गोवा
9822176170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈