श्री सुजित कदम

☆ किती वाचले?  ☆

(श्री सुजित कदम जी का यह आलेख वास्तव में हमें पुस्तकों की दुनिया से रूबरू कराता है। यह एक शाश्वत सत्य है कि आज पुस्तकों के पाठक कमतर होते जा रहे हैं और यहाँ तक कि पुस्तकालयों का अस्तित्व भी खतरे में है। यह आलेख समाज में पुस्तकों  के महत्व को अवगत कराता है।)

आयुष्यात आपण किती कमवलं ह्या पेक्षा किती वाचलं हा विचार जोपर्यंत आपण करत नाही..तो पर्यंत आपण फक्त श्वास घेण्यापूरता जन्माला आलोय असं समजावं..,कारण पुस्तके वाचताना आपल्याला पुस्तकातली एखादी व्यक्तीरेखा आपलीशी वाटू लागते..

ती व्यक्तीरेखा आपण जगत जातो.. किबंहूना जगत असतो..,अशा एक ना अनेक पुस्तकातून आपणच आपल्याला नव्याने घडवत जातो.

ही जडण घडण होताना समाजाचा एक भाग बनून रहाता आल पाहिजे. जहालाशी जहाल आणि मवाळाशी मवाळ संवाद साधता आला की माणस  आपोआप जवळ येतात. पुस्तकांसारखे ती ही बरंच काही शिकवून जातात.

आवडत्या पुस्तकाची तर आपण कित्येक पारायण करतो .. का? तर त्यात कुठेतरी, आपल्याला मनासारखं जग, जगण्याची जिद्द, समाधान, वास्तवतेचं भान, आणि योग्य दिशा असं बरचं काही मिळत जातं ..

आपण माणसं… एक वेगळ्याच विश्वात वावरत असतो..जोपर्यंत आपल्याला आपला फायदा दिसत नाही तोपर्यंत आपण त्याकडे लक्ष देत नाही…,!

वाचनाचे फायदे म्हणाल तर…,ते माणसांच्या स्वभावा प्रमाणेच बदलत जाणारे आहेत.., काहीना पुस्तक जिवापाड आवडतात तर काहींना पुस्तकं वाचताना झोप येते..,!

आयुष्यास कंटाळून आत्महत्ये सारखा विचार करणाऱ्यानी…एकदा तरी पुस्तकांना आपलंस करून पहावं…! आजकालच्या मुलांना पुस्तकं वाचता का..?

विचारल्यावर.., आम्ही फक्त आभ्यासाची पुस्तकं वाचतो हेच उत्तर मिळत..खरतरं…,शाळेच्या पुस्तका बाहेर ही पुस्तकांच भलमोठं जग आहे  हे त्यांना कळतच नाही..!

शाळेची पुस्तकं आपल्याला चौकटीतलं जग दाखवतात तर साहित्यिक  पुस्तकं आपल्याला चौकटी बाहेरच जग दाखवतात….!

वास्तवतेचं भान..,आणि बदलत्या समाजाशी जूळवून घेण्याची जाण.., वाचना शिवाय अशक्य आहे…!

एकदा वाचनाची आवड निर्माण झाली की  आपोआप वाचनाची सवय लागते.  वाचनाची सवय व्यासंगात रूपांतरित होते.  सुखाच्या दुःखाच्या काळात ही पुस्तके समाजातील  आपले स्थान बळकट करतात.

आपण जे वाचतो ते विचारात येतं. विचारातून आचारात येतं, आणि आचारातून कृतीत येतं. वाचनाचे संस्कार व्यक्तीला  अनुभवाचे विचार म॔थन करायला शिकवतात.  ज्ञान देण्याच कार्य पुस्तके करतात. ते स्वीकारण्याचे कार्य आपले आहे. मत परिवर्तन  आणि समाज प्रबोधन करण्याचे प्रचंड सामर्थ्य वाचनात  आहे.

म्हणूनच जाणकारांनी म्हणून ठेवलय, ”ज्याने वाचल तो वाचला  आणि ज्याने साचवलं तो सडला!”

आणि म्हणूनच …, आयुष्यात आपण किती कमवलं ह्या पेक्षा, किती वाचलं ? हा विचार जोपर्यंत आपण करत नाही..तो पर्यंत आपण फक्त श्वास घेण्यापुरते आणि  आपल्या प्रथमिक गरजा मागविण्यात पुरते  जन्माला आलोय असं समजावं..,!

 

© सुजित कदम, पुणे

मोबाइल 7276282626.

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
डॉ भावना शुक्ल

अति सुंदर