मराठी साहित्य – कविता – ? किळस ?- श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? किळस ?

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं। मैं विस्मित हूँ उनकी इस रचना को पढ़ कर। आज कितने ऐसे कवि या साहित्यकार हैं जिन्होने समाज के उस अंग के लिए लिखा है जिसे घृणा (किळस) की दृष्टि से देखा जाता है। उस अंग के लिए जिनका जीवन ही श्राप समान है। श्रीमती रंजना जी की कविता अनायास ही बाबा आमटे जी की याद दिला देता है जिनका सारा जीवन ही कुष्ठ रोगियों  की सेवा में व्यतीत हो गया। ऐसे विषय पर इस अभूतपूर्व भावुक एवं मार्मिक रचना के लिए श्रीमती रंजना जी आपको एवं आपकी लेखनी को नमन।)

 

नाही किळस वाटली त्यांना अंगावरच्या जखमांची.

आणि झडलेल्या बोटांची….

पांढरपेशी सुशिक्षित आणि स्वतःला….

सर्जनशील सुसंस्कृत समजणाऱ्या समाजाने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोग्यांची ….

धुतल्या जखमा केली मलमपट्टी घातली पाखरं मायेची….

अंधकारात बुडलेल्या जीवांना दिली उमेद  जगण्याची …..

पाहून सारा अधम दुराचार असह्य झाली पीडा अंतःकरणाची ..!

हजारोच्या संख्येने जमली जणू फौजच ही दुखीतांची.,

रक्ताच्या नात्यांनाही नाकारले

तीच गत समाजाची . …

कुत्र्याचीही नसावी…. इतकी ! लाही लाही… झाली जीवाची.

दुखी झाली माई बाबा ऐकून  आमच्या कहानी कर्माची …..

पोटच्या मुलांनाही लाजवेल .,…!

अशी सेवा केली सर्वांची…..

माणसं जोडली….. सरकारानेही दिली साथ मदतीची …..

स्वप्नातीत भाग्य लाभले…

आणि उमेद आली जगण्याची.

आमच्यासाठी आनंदवन उभारले .. अन्

माणसं मिळाली हक्काची……

आता अंधारच धुसर झाला …..

प्रभात झाली जीवनाची . …

देवालाही लाजवेल अशीच

करणी माई आणि बाबांची .,…..

खरंतर आम्हालाच किळस येते

आता तुमच्या कुजट विचारांची….

तुमच्या कुजट विचारांची….

तुमच्या कुजट  विचारांची

 

©  रंजना मधुकर लसणे✍

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105