श्री विक्रम मालन आप्पासो शिंदे

(श्री विक्रम मालन आप्पासो शिंदे जी का e-abhivyakti में हार्दिक स्वागत है ।  e -abhivyakti पर पिछले दिनों  आपके द्वारा लिखी गई  श्री विजय यशवंत सातपुते जी की पुस्तक “प्रकाश पर्व ” की समीक्षा प्रकाशित की थी  जिसे अच्छा प्रतिसाद मिला। समाजसेवी श्री शांताराम गरुड जी  के सेवाभाव पर  यह आलेख वास्तव में उनका एक अविस्मरणीय संस्मरण है जिसे हम अपने पाठकों के साथ साझा कर रहे हैं। यह आलेख श्री विक्रम आप्पासो शिंदे जी की  समाज सेवा भावना को भी प्रदर्शित करता है। )

 

☆ पुष्पकचा सेवाभावी गरुड़ ☆ 

(श्री शांताराम गरुड़ – आयुष्यपणाला लावून अखंड सेवेच व्रत चालवणारा एक सच्चा समाजसेवक, माणुसकिचा  कैवारी..!)

 

एखदाचा साताऱ्याहुन पुण्याला पोहोचलो.पाच-सव्वापाच वाजल्या असतील..वरती आभाळाच थैमान चालू झालं होत आणि माझ्या डोक्यातदेखिल विचारांनी थैमान माजवल होतं. कारण आज बऱ्याच दिवसांनी त्या साताऱ्या मधील yc कॉलेज मध्ये बराच वेळ  एकांतात घालवला होता…जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या आणि तिच्याशी जवळपास 1 मिनीट 12 सेकंदाचाच संवाद झाला होता. बाकि संवाद मुकाच होता.

गरुड काका आणि मी…अव्यक्त सर्व काही?

स्वारगेट ला pmt च्या स्टॉपवर थांबलो होतो. बऱ्याच वेळ झालं डोक्यातल काहूर शांत होत नव्हतं…आजुबाजुला गर्दीही वाढत होती. अजुनतरी सेनापती बापट रोड ला जाणाऱ्या बसचा कुठेही थांगपत्ता नव्हता.चर्..चिक..चिक.. या बस च्या जोरात दाबलेल्या ब्रेक च्या आवजाने भानावर आलो ..! समोर सेनापती बापट रोड वरुन जाणारी बस थांबली आणि अखेर मी मोठ्या कसोशिने मार्गस्थ झालो.बसल्या बसल्या सीटवर एक मोठासा सुस्कारा टाकला आणि तेवढ्यात खाकी वर्दीतील एक निरागस..भाबड़ ..चेहऱ्यावर कृतज्ञतेचा भाव स्पष्ट दिसणार्ं पन्नाशीतल व्यक्तिमत्व शेजारी येवून बसले.मला जरा त्यांच्याबद्दल आपुलकी वाटली. न राहून त्यांच्याशी बोलता झालो.थोडेसे चोचरे बोलत बोलत तेही माझ्याशी संवाद साधू लागले. आणि त्या साध्या सरळ विभूती पलिकडचे लाखमोलाचे कार्य स्पष्ट होवू लागले….मी ते सर्व अचंबित होवून ऐकतच राहिलो. त्याचं नाव होत “शांताराम गरुड़” आणि ते महानगर पालिकेच्या शव वाहणाऱ्या बस “पुष्पक” वरती गेली 12 वर्षे  ड्राईवर म्हणून कार्यरत होते. म्हणजे आयुष्यातील एक तप या माणसाने मृत्युपलिकडच्या माणसांमध्ये घालवले होते. दररोज स्वारगेट डेपो अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण पुणे क्षेत्रातील दोन व्यक्तींच्या पार्थिवाशी सामना होत होता या माणसाचा. कित्येकांची प्रेतं या माणसाने उघड्या डोळ्यांनी पाहिली होती. कित्येकांचे रडवलेले मुखवटे हा इसम दररोज पाहत होता. दुर्दशा झालेल्या कुटुंबाची व्यथा याच माणसाने पाहिली होती. 12 वर्षामध्ये न थकता अविरतपने गरुड़ काका मृत्युच्या पलीकडे गेलेल्या माणसांची सेवा करतच होते. पुष्पक हे शव वाहन चालविन्यास दुसरा कोणताच ड्राईवर तयार होत नसे मात्र गरुड़ काका खऱ्या अर्थाने पुष्पकाचे  गरुड़ ठरले होते. 12 वर्ष्यात जवळपास 7500 हजार पार्थीव् वाहुन न्हेणारे गरुड़ काका आता बोलता बोलता पाप पुण्य आणि खऱ्या अर्थाने सेवा सुश्रुषा काय असते याबद्दल बोलते झाले. मी सुन्न होवून ऐकताच राहिलो. त्या चोचरेपनातून त्यांनी एक किस्सा सांगितला..तो त्यांच्या आयुष्यातील.!!  काकांचा two व्हीलर वरुन वार्जे मध्ये मोठा एक्सीडेंट झाला होता.त्यावेळी ते pmt त बस ड्राईवर म्हणूनच काम करत होते. 3 वर्षे कोमात गेल्यावर काका पुन्हा हळूहळू चांगले झाले. तेव्हा त्यांच्या घरच्यांची झालेली दयनीय अवस्था काकांनी पाहिली होती. ती दुःखाचि व्यथा जणू त्यांनी तिथुनच प्यायली होती. आणि पुन्हा कामावर रुजू होताना त्यांनी ठरवल होते की “जिवंत माणसांची सेवा सुश्रुषा फार झाली आता..या मेलेल्या लोकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबसाठी उरलेले आयुष्य सेवा सुश्रुषा करण्यात वेचायच्. आणि तेव्हापासून आज अखेर पर्यन्त हा माणूस तितक्याच् निष्ठेने पुष्पक च्या माध्यमातून प्रेतवाहिनिवर कार्यरत झाला. कित्येक आक्रोश ऐकले त्यांच्या कानांनी..आकांत करणाऱ्या स्त्रीया-माणस…गहिवर घालणारे चिमुकले जिव…हाम्बरडा फोडणाऱ्या माउली..तर कधी शांतपणे केविलवाण्या होऊन त्यांच्या पुष्पक मधून स्मशानाकडे फुंदत चाललेल्या प्रेतयात्रा..बस्स!!!  आता मी पुन्हा अस्वस्थ झालो होतो आणि काका सहजपणे बोलत होते. कल्पनाशक्ति आता माझाच खून करू पाहत होती आणि त्याच क्षणाला माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी पुन्हा मोठासा सुस्करा सोडला आणि अखेर त्यांना बोलता बोलता थाम्बवलच..!! त्याचं खुप कौतुक केल. ती कौतुकाची थाप माझ्यासारख्या त्यांच्या मुलाच्या वयाच्या पोराकडून मिळताना देखील ते तेवेढेच उत्साही आणि समाधानी दिसत होते. आज खऱ्या अर्थाने आयुष्यपणाला लावून सामाजासाठी झटनारा प्रामाणिक समाजसेवक मला भेटला होता. त्या सेवेतच त्यांनी त्यांच्या आयुष्याचा राम पाहिला होता जणू,,.कोणत्याही पुरस्काराचा मानकरी हा माणूस कधीच झाला न्हवता ना कधी श्रेयवादासाठी हा माणूस रुसला होता!! हाच खरा समाजसेवक होता…! पण तरीही दुर्लक्षित??

श्रेयवादासाठी…नावासाठी….वैयक्तिक स्वार्थासाठी..नावलौकिकसाठी समाजकार्याच्या नावाखाली समाजालाच थुका लावणारे असामाजिक कार्यकर्ते आजपर्यंत कैक पाहिले होते पण त्यात शांताराम गरुड़ कुठेही गवसले नव्हते..गाडगेबाबा ही नव्हते आणि नव्हते तिथे कधी आमटे  कुटुंब..!!!

बालभारतीच्या कार्नर ला बस टर्न घेवू लागली तेव्हा मी त्यांच्या सोबत एक माझ्या आठवणीसाठी सेल्फ़ी घेतला आणि पुढच्याच् शेती महामंडळ च्या स्टॉपवर् त्यांचा निरोप घेऊन उतरलो.

आता पुन्हा डोकं गरम झाल होत..

आज तीन प्रसंगांनि तीन वेगळ्या दुनियेंच दर्शन घड़वल होत..! वैयक्तिक,नैसर्गिक आणि सामाजिक जगण्याची..कर्तव्याची सूत्र एकाच दिवसात अनुभवायला मिळाली होती. तिचा,पावसाचा आणि गरुड़ काकांच्या चिंतनाचा हिशोब करता करता अखेर रूमवर पोहोचलोच आणि मग ही लेखनी तुमच्याशी बोलू लागली..!!!

अजुन अंधारात असणाऱ्या खऱ्या समाजसेवकांचा गौरव होणार की नाही..! त्यांच्या कार्याचे किमान त्यांना समाधान मिळावे म्हणूनतरी सन्मान होईल की नाही.खरे हीरो फ़िल्म मध्ये डायलाग मारताना कधीच  नाहीत दिसणार ..तर ते  समाजाच्या तळागाळात समाजाचा बोझा  आपल्या खांद्यावर घेताना दिसतील.त्यांनाच सलाम माझा..!! तुमच्याकडे असेल एखादा पुरस्कार तर त्या पुरस्काराचाच सन्मान होईल ऎसा सेवक पाहून न्याय देण्याचा प्रयत्न करा..! परिवर्तन नक्की होईल.!

आता तुम्हीच ठरवा…खरा समाजसेवक कोण??

मला छळणारी ती……..लेखनी!!

तिच्या आठवणीत विचारांच् थैमान माजवणारा तो……पाऊस!!

मरणोत्तरांची सेवा करणारे ते…..गरुड़ काका??

 

©  कवी विक्रम मालन आप्पासो शिंदे

मु/पो-वेळू(पाणी फाउंडेशन), तालुका-कोरेगाव, जिल्हा-सातारा 415511

मोबाइल-7743884307  ईमेल – [email protected]

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

4 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Poonam Thakare

अतिशय अप्रतिम अभिव्यक्ती मांडलीय , खरच पडद्यावरील हिरो पेक्षा पडद्यामागील हिरोंचा पुरस्कार करायला हवा कारण समाजासाठी झटनारे च खरे हिरो,??

Shinde Vikram Appaso

अगदी योग्य

Ashwini patil

प्रकाश झोता पासून लांब असलेली , किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त महान कार्य केलेली बरीच माणसं या जगात आहेत आणि ती आपल्याला समाजात भेटत ही आहेत अशाप्रकारे ,आपण फक्त त्यांना अशाप्रकारे प्रोत्साहानाची थाप देऊन , त्यांच्या नोंदी ठेवणे गरजेचे आहे आणि त्यांना उंच माझा झोका , हिरकणी सारखे पुरस्कार पुरुषांनाही कसे देता येतील याकडे भावी समाजकार्याचा भाग म्हणून पाहिले पाहिजे . खूप छान लेखन……..

Shinde Vikram Appaso

सहमत…आणि धन्यवाद ताई साहेब