श्री कपिल साहेबराव इंदवे
(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है। आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है। एक युवा लेखक के रुप में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते। हम भविष्य में श्री कपिल जी की और उत्कृष्ट रचनाओं को आप तक पहुंचाने का प्रयास करेंगे। आज प्रस्तुत है युवाओं के जीवन पर सोशल मीडिया , विभिन्न एप्स , ऑन लाइन/ऑफ लाइन गेम्स आदि के उनकी शिक्षा, नौकरी एवं सामाजिक जीवन पर विचारोत्तेजक आलेख तरूणांसमोर पर्याय काय?।)
☆ तरूणांसमोर पर्याय काय? ☆
माणुस कितीही लढवय्या असला तरी जर त्याच्या लढण्याला योग्य दिशा नसेल. किंवा कशासाठी लढतोय हे स्पष्ट नसेल. तर त्याच्या लढण्यालाही अर्थ उरत नाही. माणसाचा स्वभाव चंचल आहे. मन अस्थिर आहे. हे त्या गोष्टीमध्ये जास्त गुंतते ज्याच्यामुळे वेळ वाया जातो. ज्याच्याने वेळ कामांस येईल असं खुप कमी होतांना दिसतं. आणि आजच्या काळात वेळ वाया घालवण्यासाठी नवनवीन माध्यमे उपलब्ध आहेत. त्यात मोबाईल, टि. व्ही. संच वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत. असं म्हटलं जातं कि एका नाण्याचे दोन बाजू असतात. या साधनाच्याही आहेत. फायदे आणि नुकसान प्रत्येक गोष्टीचा असतो. तसं यांचही आहे. काही फायदा वगळता तोटेही बघायला मिळतात.
आज इंटरनेट मुळे जग जवळ आलं असलं. तरी जवळची माणसं दुर गेलेली दिसतात. इंटरनेटच्या या जगात शाॅर्ट मॅसेज सर्व्हीसचा बोलबाला आहे. कारण फेसबुक व्हाटसअॅप वगैरे अशा अनेक अॅप आहेत ज्यांच्याद्वारे पुर्ण माहिती न देता ती एडिट करून प्रसारित केली जाते. किंवा कोण कोणाबद्दल काय बोललं हे फक्त दाखवलं जातं. मग तो का बोलला, कशाबद्दल बोलला याचं कोणाला काहीही घेणं देणं नसतं. याच एडिटींगच्या आणि शाॅर्ट मॅसेज सर्व्हीस मुळे कधी कधी संकुचित विचार होऊन सामाजिक एकोपाही धोक्यात येतो.
आज फेसबुक व्हाटसअॅप वगैरे यांसारख्या सोशल मिडियावर अनेक गृप स्थापन केले जातात. आणि या गृपमध्ये ही अपूर्ण माहीती काॅपी पेस्ट करण्याचे काम सर्रासपणे होताना दिसतं. याच गृपमधुन अस्वीकारार्ह पोस्टही टाकल्या जातात. त्यातुन कधी कधी अघटीतही घडतं. म्हणुन सोशल मिडिया वापरणं वाईट आहे असं मी म्हणणार नाही. पण आपन त्याचा कसा वापर करतो. ही गोष्ट इथे महत्वाची ठरते. जसा सोशल मिडियाद्वारे भडकाऊ अस्वीकारार्ह किंवा अश्लील पोस्ट टाकल्या जातात. त्याच सोशल मिडियावर राष्ट्रीय एकात्मतेच्या, सामाजिक बांधिलकीच्या, विज्ञान व तंत्रज्ञान, महापुरूषाच्या माहितीच्या आणि आजच्या तरुण पिढीसाठी उपयुक्त अशा स्पर्धां परीक्षाच्या- उद्योग धंद्याच्याही पोस्ट टाकल्या जातात. आता यातुन आपल्याला कोणत्या पोस्ट फाॅरवर्ड करायच्यात किंवा डिलीट करायच्या ते वापरकर्तावर अवलंबून आहे.
पण प्रश्न असा आहे कि या सोशल मिडिया किंवा टेलेव्हिजन संच यामध्ये अडकून राहणा-या आणि या असल्या पोस्टने आजची तरूण पिढी तर बळी नाही ना पडत. याचा आधी विचार करायला हवा. कारण हीच तरुण पिढी देशाचा आधारस्तंभ आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा कि असल्या आक्षेपार्ह किंवा अस्वीकारार्ह पोस्ट न टाकता काही माहीती तंत्रज्ञानाच्या किंवा इतरही उपयोगाच्या पोस्ट केल्या तर तरूणांना त्याचा फायदाच होईल. आणि अप्रत्यक्ष देशाचा विकासालाही हातभार लागेल. आता ते वापरकर्ता वर अवलंबून आहे कि काय पोस्ट करावं नि काय डिलीट.
आणि जर समजा हि तरूणाई या सोशल मिडियापासुन लांबच राहीली तर अनेक गेम्स सध्या उपलबध आहेत. जसं पबजी, सब वे , वगैरे. या गेममध्ये असा काही अडकून जातात कि आजुबाजुला काय घडतंय. याचं भानच उरत नाही. एकप्रकारे विचार करण्याचा वाटाच बंद होऊन जातात. याचं गेम्स मुळे मुलांचे जिवही गेलेयत. जास्त काळ मोबाईलकडे पाहत राहिल्याने अंधत्वही आल्याच्या बातम्या मध्यंतरी वाचायला मिळाल्या होत्या. तरी ही तरूण पिढी त्यातुन बाहेर निघायला तयार नाही. यामुळे समाजाचं आणि देशाचंही नुकसान होत आहे. मोबाईल, टी व्ही, इंटरनेटचा वापर सिमित करून जर ही तरूणाई उद्योग धंद्यात गुंतली तर ते देशाच्या विकासाला नक्किच पोषक ठरणार आहे.
आज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होतंय. शेतीसाठी उपयुक्त माहिती किंवा घरगुती उद्योगांची माहीती आत्मसात केली तर स्वत उद्योग धंदे स्थापन करू शकतात. अशी महीती मोबाईलवर एका क्लिकने मिळते. यामुळे काही अंशी बेरोजगारीही कमी व्हायला मदत होईल. दरवर्षी डिग्री घेऊन लाखो मुलं बाहेर पडताहेत. डिग्री घेतल्या घेतल्या नोकरीच्या शोधात निघणा-या मुलंचाही एक वेगळाच ताफा आहे. डिप्लोमा, इंजिनियरींग, मेकॅनिकल वगैरे असंख्य विषयांत डिग्री संपादन करून मुलं महिन्याच्या एक तारखेला कंपन्यांच्या गेटवर काम मागण्यासाठी उभे राहतात. नाहीतर वर्षानुवर्षे न संपणारा एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी च्या मार्गावर चालतात. पण दरवर्षी डिग्रीधारक विद्यार्थी आणि आणि वर्षभरात निघालेल्या जागा यांत खुप मोठी तफावत असते. म्हणुन याही क्षेत्रात डाळ न शिजलेले विद्यार्थी एक तर गावाकडे परत जाऊन वाडिलोपार्जित शेती सांभाळतात. किंवा पुणे, मुंबई सारख्या बड्या शहरात एम. आय. डी. सी. चा रस्ता धरतात. आणि हे भविष्यातले क्लास वन क्लास टू चे अधिकारी आठ दहा हजाराची नोकरी करतात. एकप्रकारे स्वेच्छित गुलामगिरीच स्विकारता. आणि आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या किंवा न शिकलेल्या अनुभवी लोकांच्या हाताखाली काम करतात. मी असं म्हणत नाही कि कमी शिकलेला किंवा न शिकलेला माणुस अज्ञानी असतो. त्या माणसांत असलेली क्षमता आणि त्याच्याकडे असलेल्या कौशल्याचा जोरावर तो इथपर्यंत आलेला असतो.
पण होत काय कि हा डिग्री घेउन हेल्परचं काम करणारा मुलगा जास्त करून सोबत काम करणा-यांच्या रडारवर असतो. खरं तर त्याचं शिक्षण त्यांच्या रडारवर असतं. उदा. बघा एखादा दहावी, बारावीचा मुलगा काम करत असेल आणि सोबतच एखादा डिप्लोमा इंजिनियर झालेला मुलगा काम करत असेल. आणि दोघांकडून काही चुक झाली तर उच्च शिक्षित म्हणुन डिप्लोमा वालाला टारगेट केलं जातं. त्यासाठी काही शब्द ठरलेली असतात. कि काय फायदा एवढ्या शिक्षणाचा, शिकला तेवढा चुकला, आणि कोणता मास्तर होता रे तुला शिकवायला वगैरे असे शब्द बोलले जातात. त्याला बिचा-याला बोलता येत नाही. मुकाट्याने ऐकून घ्यावं लागतं. आणि शिक्षित मुलापेक्षा, त्याच्या डिग्रीपेक्षा आपण कसे सिकंदर आहोत हा भाव चेह-यावर आणला जातो.
परिणामी त्या मुलाला आपल्या शिक्षणाची लाज वाटायला लागते. त्याच्या आयुष्यात जे काही वाईट घडतं त्याला तो त्याच्या शिक्षणाला जबाबदार मानतो. यातूनच त्याला नैराश्य येते. आणि या नैराश्यातुन तो वाईट मार्गाला लागतो. पण अशा वेळी नैराश्याने ग्रसून न जाता अशा परिस्थितीत शांत डोकं ठेवून विचार करायला हवा. कारण याही प्रसंगात आपल्याकडे अनेक वाटा शिल्लक असतात. पण त्या वेळेवर दिसत नाही. कारण त्या शिक्षणाबददलच्या भयंकर रागाने मेंदू काबीज केलेला असतो. म्हणुन त्याला कोणतीही वाट दिसत नाही. आणि तो वाईट गोष्टींकडे आकर्षिला जातो. अशा वेळी स्वतःला शांत ठेवून जर उपाय किंवा मार्ग शोधले तर त्याचा नक्किच फायदा होईल. त्यात स्वयंरोजगार हा एक पर्याय असू शकतो. आपल्या शिक्षणाची तमा न बाळगता जर छोटे मोठे व्यवसाय स्थापन केले तर ती सुखी भविष्याची पेरणी ठरू शकेल. पण ते करायला आपन धजत नाही. कारण शिक्षण म्हणजे नोकरी ब्रीदवाक्यच बनून गेलंय. ही मानसिकता बदलनं गरजेचं आहे.
आणि दुसरा म्हणजे डायरेक्ट सेलिंगचा ही एक पर्याय राहू शकतो. काही अपवाद वगळता आणि भविष्यात ऑनलाईन पकड पाहता डायरेक्ट सेलिंग हा एक सक्षम पर्याय बनून उभा राहू शकतो. पण डायरेक्ट सेलिंग म्हटलं म्हणजे लोकं सहसा त्याच्या कडे लक्ष देत नाही. कारण आधीच्या कंपन्यानी केलेली फसवणूक लगेच लक्षात येते. पण अशाही कंपन्या आहेत कि जे कित्येक वर्षापासून खंबीरपणे उभ्या आहेत. आणि अनेक लोक यात कमालीचे यशस्वी होतांना दिसताहेत.
वरिल दोन्ही मार्गांमध्ये गरज आहे ती *रिस्क* घेण्याची. कारण उद्योग करायचे झालं म्हणजे भांडवल आलंच. त्यासाठी पैसा लागतो. चालला तर ठिक नाही तर शुन्य. म्हणुन हा रिस्क कोणी घेऊ इच्छित नाही. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. कोणत्याही फिल्डमध्ये रिस्क आहेच. मग नोकर बनून दुस-याच्या हाताखाली काम करून रिस्क घेण्यापेक्षा स्वत मालक बनून रिस्क घेण्यात काय हरकत आहे. कारण आधीच पंधरा- सोळा वर्षे शिक्षणात टाकली. त्यात वय लग्नाच्या दिशेने कुच करतेय. आणि स्पर्धां जास्त असल्यामुळे यशस्वी होण्याचे कमी चान्सेस. नोकरीही नाही किंवा रोजगाराचा पर्याय उपलब्ध नसेल तर हे पर्याय नक्किच तारणहार ठरू शकतील. म्हणुन तरूणांनी नैराश्याने खचुन न जाता हिंमतीने आणि आत्मविश्वासाने उभे राहून परिस्थितीवर मात करायला हवी. तेव्हाच तो एक लढवय्या शोभेल.
© कपिल साहेबराव इंदवे
मा. मोहीदा त श ता. शहादा
जि. नंदुरबार
मो 9168471113