श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का e-abhivyakti में हार्दिक स्वागत है। धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झालक  देखने को मिलती है। हम भविष्य में आपके उत्कृष्ट साहित्य की अपेक्षा रखते हैं। आज प्रस्तुत है उनका आत्मकथ्य “नाते ”।) 

 

नाते 

 

अगदी खरं आहे सायली तुझं.तूही माझी लेकच आहेस.

तुझी माझी ओळख तरी कशी झाली,तू नगरची मी सातारानिवासी.पण माझा मुलगा अनिल नगरला होता त्यामुळे मी फेब्रुवारी २००१ मध्ये तिकडं आले होते.माझ्या योगगुरुंच्या आज्ञेनुसार नगरला मी “विनामूल्य योगवर्ग “घेणार म्हणून आम्ही “केदार अपार्टमेंट , सहकारनगर येथे रहात असल्याने त्या बिल्डींगच्या तळमजल्यावरील भाजीच्या दुकानात एका चिकटलेल्या कागदावरील योगवर्गाची माहिती बघून तू वरच्या मजल्यावर चौकशीसाठी आलीस आणि पहिल्या दृष्टभेटीतच आपल्या नात्याच्या तारा जुळल्या.

हे तू वर्ग पूर्ण झाल्यानंतर त्यावेळी “तरुण भारत मुक्तमंच “ला दिलेल्या तुझ्या बातमीत नमूद केले होतेस.माझ्याकडून तुला किंवा वर्गाला मिळालेल्या योगासने, निसर्गोपचार व अन्य मोलाच्या माहितीमुळे तू खूप प्रभावित झालीस व माझं नातं तुझ्याशी घट्ट विणलं गेलं.गेल्या १८ वर्षात ते इतकं सुबक आणि सुंदर झालं की त्याचं रुपांतर मायलेकीच्या नात्यात कधी झालं ते कळलंच नाही.

नगरला मी पाहुणी असूनही तू मला तिथल्या अनेक उपक्रमात सहभागी नुसतं करुन घेतलं नाहीस तर नगरवासियांना वर्तमानपत्रातील बातम्यांद्वारे माझा परिचय करुन दिलास.हे मी कधीच विसरु शकत नाही.नगरच्या आपल्या एकूण सहा सात वर्षांच्या सहवासाने आपलं नातं खूप दाट विणलं गेलं. माझा किंवा घरातील सर्वाचे वाढदिवस लक्षात ठेऊन पहिला शुभेच्छा फोन तुझाच असतो.आता तर आपण वाटस्अॅपवर अखंड जोडलेल्या आहोतच !

यालाच तर म्हणतात खरं   नातं प्रेमाचं,आपलेपणाच,   अगदी निरपेक्ष !!

 

©®उर्मिला इंगळे, सातारा 

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Prabha Sonawane

सुंदर लेख ताई, खुप आवडला, मी तुमचे लेख आवर्जून वाचते,तुमचं कार्य छान आहे