मराठी साहित्य – मराठी आलेख – ☆ आपली नाती आणि आपले ग्रह ☆ – श्रीमति धनश्री कुलकर्णी
श्रीमति धनश्री कुलकर्णी
(श्रीमति धनश्री कुलकर्णी जी का e-abhivyakti में हार्दिक स्वागत है। वे एक संवेदनशील लेखिका और प्रयोगशील उद्यमी हैं। उन्हें संस्थागत प्रशासन का लगभग 13 वर्षों का अनुभव है। सौ. धनश्री जी भगवत गीता का अभ्यास, अध्ययन और अध्यापन भी करती हैं। इसके अतिरिक्त उन्हें ज्योतिष शास्त्र का भी ज्ञान है एवं वे सतत अध्ययन कर रही हैं। आज प्रस्तुत है उनका आलेख “आपली नाती आणि आपले ग्रह” जिसमें उन्होने रिश्तों और ग्रहों के सम्बन्धों पर प्रकाश डालने का प्रयास किया है।
☆ आपली नाती आणि आपले ग्रह ☆
घरीदारी सर्वांनी आपल्याला अनुकूल असावे असे वाटत असल्यास आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपली सर्व नाती आणि आपले ग्रह यांचा थेट संबंध आहे. मी आता कुठे ज्योतिष या विषयाचा थोडा अभ्यास करायला सुरुवात केली, आणि अर्थात स्व:ताची व घरातील मंडळी यांची पत्रिका प्राथमिक अभ्यासासाठी घेतली. आणि मग नाती आणि ग्रह यांचा थेट संबंध 100% आहे असे पटले.
आई चंद्र, वडील सूर्य, भाऊ मंगळ, बहीण (बहीण, मावशी, आत्या) बुध, तुमची पत्नी ही शुक्र तर, सर्व गुरुजन, ज्येष्ठ मंडळी व आपले पितर हे गुरू वडिलांच्या कडील नाती खास करून आजोबा राहू तर आईकडील नाती म्हणजे खास करून मामा हे केतू तर घरातील सेवेकरी मंडळी शनिदेवांचे प्रतिनिधी आहेत असे लक्षात आले..तुमचं आईशी वागणे चांगले ठेवा, तिची योग्य ती कदर ठेवा तुमचा चंद्र तुम्हांला अनुकूल फळे देईल…मातृदेवो भव चे अक्षरशः पालन करून पहा.. सूर्योपासना कराच पण त्यापेक्षा जास्त पितृदेवो भव या भावाने वडिलांना मान द्या, त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांच्या उतारवयात त्यांना सुखसमाधान कसे मिळेल ते पहा, यश कीर्ती प्रसिद्धी तुमच्या द्वारी चालत येईल, बहिणीचे (बहीण, तिचा पती, तिची मुले) लाड करा, खासकरून ती माहेरी आल्यावर तिला कधीच विन्मुख पाठवू नका, तुमचा व्यापाराची भरभराट झालीच पाहिजे आणि तुमची बुद्धी तुम्हाला कधीच दगा देणार नाही. बहिणीने देखील आपल्या भावाना (मंगळ) नेहमी साहाय्य करावे, आर्थिक शक्य असले तरी उत्तम, नसले तरी मानसिक आधार व कष्टाने देखील सहाय्य करु शकते…भावाशी (पर्यायाने त्याचा संसार, तुमची भावजय, त्यांची मुले) तुमचे चांगले संबंध हे तुमचा पती तुम्हांला नक्कीच अनुकूल होतो, प्रत्येक पतिने आपल्या पत्नीला असे वागवावे की ती घराची लक्ष्मी आहे, तिला आनंदात ठेवा, सन्मान ठेवा म्हणजे साक्षात लक्ष्मी घरी पाणी भरते याचे प्रत्यंतर येईल. ती घरची लक्ष्मी च असते जीच्या पायांनी वैभवलक्ष्मी घरी येते. याचप्रमाणे घरातील व बाहेरील ज्येष्ठ मंडळी , गुरुजन यांचा सन्मान करण्याने सर्वाधिक शुभग्रह गुरू अधिकाधिक बलवान होतो व त्यांचे आशीर्वाद फलित होत जातात. वडिलांचे आजोबा राहू, स्त्रियांसाठी स्वात:ची सासू तर मामा केतू (दोन पिढ्या आणि पर्यायाने दोन घराणी जोडली जातात) यांची काळजी घ्या राहू केतू अनुकूल झालेच पाहिजेत.
आपल्या घरातील व बाहेरील मदतनीस विशेषतः जे शारीरिक कष्ट करून आपल्याकडून मोबदला घेतात, त्यांची आपण योग्य ती काळजी घेणे अडी नडीला आर्थिक मदत करणे सणावाराला अधिक मोबदला देणे याने शनिमहाराज आपल्याला अनुकूल होतात व कृपा करतात.आपण आपली सर्व नाती सांभाळू या ग्रह अनुकूल होतीलच आणि पत्रिकेत ग्रह प्रतिकूल दिसतात तरीही पण जर आपण आपल्या नात्यांना बळकट करू तर ते ग्रह देखील अनुकूल होतात…आणि मग नाती देखील बळकट आणि अनुकूल होणारच. सगळ्यात शेवटी एकत्र कुटुंब पध्दतीने राहून एकमेकांचे ग्रह आणि पर्यायाने आयुष्य सुखसमाधानात जगणाऱ्या आपल्या पूर्वजांच्या बुद्धीचे, ज्ञानाचे कौतुक वाटल्याशिवाय कसे राहील! त्याना मनानेच साष्टांग प्रणिपात करून इथेच थांबते.
© धनश्री कुलकर्णी, पुणे
मो. 9850896166