मराठी साहित्य – मराठी आलेख – ☆ बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण आणि हृदयात वाहत असलेली दुःखाश्रूची धार ☆ – श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते. हम भविष्य में श्री कपिल जी की और उत्कृष्ट रचनाओं को आप तक पहुंचाने का प्रयास करेंगे.

आज प्रस्तुत है  उनका  स्वर्गीय डॉ बाबासाहेब भीमराव अम्बेडकर महापरिनिर्वाण दिवस पर  अश्रुपूरित श्रद्धांजलि अर्पित करता हुआ विशेष आलेख  “बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण आणि हृदयात वाहत असलेली दुःखाश्रूची धार”।  )

 

बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण आणि हृदयात वाहत असलेली दुःखाश्रूची धार

 

साल 1956. डिसेंबर महिन्याचा सहावा दिवस. अन् हृदयत धडकी भरवणारी, उभ्या भारताच्या काळजाचा ठोका चूकवणारी बातमी सुर्य प्रकाशाच्याही अती वेगाने भारतासह जगात पसरते. समतेची, ज्ञानाची आणि न्यायाची ज्योत पेटवून ती अखंडपणे तेवत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयांवर सोपवून ज्ञानाच्या प्रखर तेजाने तडपणारा क्रांतीचा सुर्य, प्रत्येक भारतीय जनमानसाच्या डोळ्यांचे तेज असणारा एक प्रखर तेजोमेघ दिल्लीत मावळतो. आणि न भूतो न भविष्यति असा अश्रूंचा महापूर संपूर्ण भारतातून एकसोबत वाहतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाणाची बातमी एकून धरणीही शहारते. या भारत भूमीची शान आज तिच्या कुशीत शांत झोपी गेली होती. आकाशात तडपणारा सुर्यच्याही अंगाला काटे फुटले असावेत. महासागरातही एवढा ओलावा नसेल एवढी ही भारतभूमी पाणावली होती. ज्वालामुखीच्या जबरदस्त स्फोटाने प्रचंड हादरे बसावेत तसा दिल्लीचा दरबार हादरला. जनसामान्यांपासून ते तत्कालीन प्रधानमंत्री, राष्ट्रपतींपर्यंत सगळ्यांचीच पायाखालची जमीन सरकली. त्या गुरूवारच्या रात्री दोनच्या सुमारास ‘त्या’ तेजोमेघाला घेऊन विमान मुंबईला उतरलं. दादरस्थित राजगृहावर नेण्यात आले. तोपर्यंत अरब सागरालाही लाजवेल. असा प्रचंड जनसागर तेथे धडकला होता. दादरच्याच शिवाजी पार्कवर अरबी समुद्राच्या किनारी चैत्यभूमीवर उभ्या भारताचा भाग्य विधाता चंदनाच्या चितेवर चिरनिंद्रेत झोपला होता. तेव्हा तो अरब सागरही बाबासाहेबंना डोळे भरून पाहण्यासाठी, वंदन करण्यासाठी दादरच्या किनारी धावून आला. आणि बाबासाहेबांचे अंतीम दर्शन घेऊन ढसाढसा रडला. आणि समोर उभा असलेला बाबासाहेबचा विचारांचा जनसागर पाहून शेवटचे बाबासाहेबांच्या  पायावर नतमस्तक होऊन माघारी फिरला.

बाबासाहेबांनी शेवटचा श्वास आजपासून 63 वर्षाआधी दिल्लीत घेतला. 56 साली डिसेंबरच्या पहिल्या गुरूवारी ही बातमी भारतासोबतच जगभर पसरली. आणि आकाशात सुर्य मावळावा तसा ज्ञानाच्या प्रखर तेजाने तडपणारा क्रांतीसुर्य भारतात मावळला आणि जनसामान्यांच्या मनांत काळोख झाला. पण बाबासाहेबांनी त्या गर्द काळोखातही जीवनरूपी रस्ता पार करण्यासाठी संविधान नावाची एक ज्योत भारतीय नागरिकांच्या हाती दिली. आणि प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्या विचारांचं सुरक्षाकवच प्रत्येक भारतीयाला दिले.

बाबासाहेबांच्या पश्चात 63 वर्षापासून भारतीय संविधान सामान्य माणसाचं, पददलित,  गोरगरिब जनतेचं आणि स्त्रियांची रक्षण करतेय. अमानवी अत्याचाराने भरलेल्या त्या विषमतावादी सापाला आपल्या विचारांच्या धारेने ठेचून काढतंय.

संविधानाच्या  अंमलबजावणीच्या दिवसापासून ते आज पावेतो काल परवाच हैदराबादला प्रियंका रेड्डी सोबत पिशाची वृत्तीचा नराधामांनी माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली. तशा घटना तेव्हापासून एव्हाना त्याच्याही आधीपासून घडताहेत. मग ती दिल्लीची निर्भया असो, कि खैरलांजीची प्रियंका भोतमांगे, जम्मूची आसिफा असो कि माग हैदराबादची प्रियंका रेड्डी. नाव, चेहरे, ठिकाण बदलतंय. नराधामांची कृती मात्र तीच. असले पिशाची कृत्य करणारे लोकं त्या मानसिकतेचे असतात. जे वासनेची भूक भागवण्यासाठी स्वतःच्या घरचे दरवाजे तोडायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. अशा नीच मानसिकतेच्या लोकांची शिक्षा एकच आणि ती म्हणजे अंत. नव्हे क्रूर अंत.

पण प्रश्न असा उपस्थित राहतो. की अशा लोकांना शिक्षा देण्यात कायदा कमी पडतोय का?  मागील काही दिवसांपासून सोशल मिडियाच्या माध्यमातून कायद्यावर, प्रशासनावर बोट ठेवलं जातंय. काहींनी तर कायदा पूर्णपणे निष्क्रिय आहे असे शिक्कामोर्तब देखील केले. माझ्या वाचनात आलेल्या ज्या काही ट्विट किंवा फेसबूक, व्हाटसअॅप वरिल मॅसेज होते. त्या मॅसेजेस किंवा नेटकरी बांधवांबद्दल किंवा त्याच्या ट्विटस बद्दल काही म्हणायचे नाही. पण एक गोष्ट मी जरूर म्हणेन की ज्या दिवशी संविधानाचा स्विकार केला गेला त्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी ‘ संविधान कितना ही अच्छा क्यो ना हो वो अंततः बुरा साबित होगा अगर उसे इस्तेमाल मे लाने वाले लोग बुरे होंगे और संविधान कितना ही बुरा क्यो ना हो वो अंततः अच्छा साबित होगा अगर उसे इस्तेमाल मे लाने वाले लोग बुरे होंगे इसलिए जनता या राजनीतिक दलों को संदर्भ मे लाये बिना संविधान पर कोई भी टिप्पणी करना मेरे विचार मे व्यर्थ है’  हे स्टेटमेंट दस्तुरखुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच आहे. आणि मला वाटतं जे कायदा व प्रशासनावर बोट ठेवताहेत त्यांना. हे नक्कीच समाधानकारक उत्तर आहे. आणि बाबासाहेबांचे ते विधान व्हीडीओ स्वरूपात युटयुब किंवा गुगलवर अगदी सहज सापडेल.

कोणावर टिका करायची नाही. किंवा माझं कोणाशी वैर नाही. फक्त मागील दिवसांमध्ये जे सोशल मिडियाद्वारे कायदा कमकुवत दाखवण्याचा ट्रेड चालू आहे. त्यावर आणि त्यासारख्या अनेक प्रश्नांवर बाबासाहेबांचं वरिल स्टेटमेंट अगदी योग्य उत्तर आहे असं मला वाटतं. कायदा कितीही कठोर असला तरी त्याचा अंमल योग्य होत नसेल तर त्यात कायद्याची चूक नसते तर तो राबवणा-यांची चूक असते. जर 2006 ला खैरलांजीची प्रियंका भोतमांगे आणि आजवर जेवढे बलात्कारच्या घटना घडल्या त्यांच्या गुन्हेगारांना जर फाशी किंवा देहांताची शिक्षा झाली असती तर आज हैदराबाद मध्ये प्रियंका रेड्डीला नरक यातना सोसाव्या लागल्या नसत्या. प्रियंका रेड्डीच नव्हे तर असंख्य त्या मुली ज्यांना नराधामांच्या वासनेला बळी पळावे लागले नसते. आणि आजवर ज्याही मुली या नराधामांच्या वासनेला बळी पडल्या आहेत त्यांना शिक्षा झाली तरच येणा-या काळात आपल्या आया-बहिणी सुरक्षित राहू शकतील. त्यासाठी  कायद्याचे काटेकोरपणे पालन व्हावे. असेच वाटते. जेणे करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत.

बाबासाहेबांना आदरांजली वाहत असतांना डोळ्यांतली एक धार त्या सर्व पिडीतांच्या दुःखासाठीही वाहत आहे.

 

 

© कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा, जि. नंदुरबार (महाराष्ट्र)

मो  9168471113