मराठी साहित्य – मराठी आलेख – ☆ नव वर्ष विशेष -आज ह्या इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस… ☆ – सुश्री आरुशी दाते

सुश्री आरुशी दाते

( नव वर्ष की पूर्व संध्या पर  सुश्री आरूशी दाते जी  का  एक आलेख आज ह्या इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस… )

 

☆ आज ह्या इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस…  

 

ह्या वर्षी जीवनात अनेक चढ उतार पाहिले, भिन्न भिन्न लोकांना भेटले, काही लोकं सोडून गेले(का ते मला माहित नाही), काही नवीन लोक जोडले गेले, काही जुनेच लोक नव्याने समोर आले…

खूप सारे अनुभव गाठीशी आले, कोणी चिखलफेक केली तर कोणी कौतुकाची फुलं उधळली, खूप गोष्टी शिकायला मिळाल्या… मला माझा छंद जोपासता आला… अपेक्षित, अनपेक्षीत प्रसंगांना सामोरं जावं लागलं, कधी कधी पार खचून गेले, कधी कधी तब्येतीनं नाराजी व्यक्त केली…

हाती घेतलेली काही कामं सोडून द्यावी लागली, तर नवीन कामांची जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागली… पण हा प्रवास कुठेही थांबला नाही… मानसिक, शारीरिक, भावनिक आणि आर्थिक बाजू सांभाळताना होणारी ससेहोलपट आठवली की अंगावर शहारा येतो… अनेक संकटे आली तरी, सुखाच्या क्षणांनी संकटांना तोंड देण्यासाठी पंखात बळ दिले…

ह्याच सुखाच्या क्षणांना सोबत घेऊन आणि हे सुखाचे क्षण माझ्या आयुष्यात आणणारे माझे पती, माझी मुलगी, सासरचे कुटुंबीय, माहेरचे कुटुंबीय, नातलग आणि जीवश्च कठश्च मित्र मैत्रिणी ह्यांच्या सोबतीने पुढील वर्षात पदार्पण करते…

तुम्हा सर्वांचे आभार मानते आणि तुमच्या ऋणात राहू दे हेच मागणे मागते…

आपणासर्वांना नवं वर्ष सुखाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

 

लोभ असावा,

 

© आरुशी  दाते