मराठी साहित्य – मराठी कथा – ☆ वेग वाढला आणि शर्यत संपली ☆ – श्री कपिल साहेबराव इंदवे
श्री कपिल साहेबराव इंदवे
(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक के रुप में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते. हम भविष्य में श्री कपिल जी की और उत्कृष्ट रचनाओं को आप तक पहुंचाने का प्रयास करेंगे.
आज प्रस्तुत है उनकी एक हृदयस्पर्शी कहानी वेग वाढला आणि शर्यत संपली. हम सड़क पर भावावेश में अपने वाहनों की गति बढ़ाकर स्पर्धा करते हैं और अचानक एक क्षण आता है जब स्पर्धा, दौड़ , शर्त और जीवन सब समाप्त हो जाता है. हम यह भी भूल जाते हैं क़ि हमारे साथ कई लोग जुड़े हुए हैं जो जीवनपर्यन्त उस दुर्घटना को जीते हैं. )
☆ वेग वाढला आणि शर्यत संपली ☆
स्पर्धेच्या मैदानावर धावतांना वेग अतिशय महत्वाचा असतो. आणि त्या वेगाला संयमाची जोड असली कि स्पर्धक स्पर्धेत शेवटपर्यंत टिकून राहतो. आयुष्यही तसंच आहे अगदी स्पर्धेसारखं. इथ प्रत्येक माणुस स्पर्धा करतो आणि पळतो. आणि शर्यत जिंकतो. पण आशा काही शर्यती असतात ज्या जीवावर बेततात. माणसाला आपला प्राण गमवावा लागतो. आणि एकदा जीव गेला म्हणजे शर्यत संपते.
अशीच एक वेगाची शर्यत परवाच झाली. काही दिवसांपूर्वी जल संकटाने महाराष्ट्राला हैराण केलं होतं. त्या जखमातून महाराष्ट्र अजून सावरलेलं नाही तोच महाराष्ट्राच्या उत्तरेत असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील निमगूळ येथे बस आणि कंटेनर मध्ये धडक झाली. आणि वेगाचा या अघोरी खेळात तेरा ते चौदा लोकांचा बळी चालला गेला. औरंगाबादहून शहादा कडे येणारी बस समोरून येणा-या कंटेनर मध्ये अशी काही घुसली जणू बनवणा-याने त्यांना त्यांच्या मर्जी विरूध्द वेगळे बनवले असावे. बसचा निम्म्यापेक्षा जास्त भाग त्या कंटेनर मध्ये घुसला होता. दोन्हीही ड्रायव्हर सोबतच बस मधील प्रवाशांचा यात नाहक बळी गेला. याच रस्त्यावर अशाच बसेस मधुन मी ही कधीतरी प्रवास केला होता. म्हणुन मला हा अपघात जरा मझ्या भावनांना जवळचा वाटून गेला
रक्षाबंधन आणि स्वतंत्र दिवसाचे पावन पर्व साजरे करण्यासाठी मी घरी गावाकडे जाऊन आलो. गावाकडे गेल्यावर शांतता असते. कसलीही वेळ फिक्स नसते. रोजच्या वेळेवर ऑफिसला जायचे नव्हते म्हणुन मी उशीराच उठलो. आणि सवयीप्रमाणे हाती मोबाईल घेतला. आणि डेटा चालू केला. रात्रीपासून डेटा बंद असल्यामुळे बरेच मॅसेज पेंडींगवर होते. मी पुर्ण मॅसेज येण्याची वाट पाहू लागलो. तेव्हा कानी आवाज आला. आमच्या शेजारी राहणारी मायाबाई तीच्या एकवीस वर्षीय मुलाच्या हाती टिफीन देता म्हणत होती कि “वेळेवर जेवून घे. जेवन परत आणू नको. पुर्ण टिफीन संपव” तो मुलगा आपल्या आईच्या शब्दाना होकार देत चालला गेला. एका आईची आपल्या मुलाबद्दलची काळजी सहाजीकच होती.
मी पुन्हा मोबाईल मध्ये लक्ष देउन एक कवितांचा समुह उघडून साहित्यीकांच्या दर्जेदार कविता आवडीने वाचायला लागलो. काही वेळाने उठलो आणि फ्रेश होऊन मामांच्या घरी गेलो. माझ्या मामांची मोठी मुलगी तीच्या बाळंतपणाला माहेरी आलीय. ती टि.व्ही. बघत बसली होती. मी सवयीप्रमाणे तीची खोडी काढायला लागलो. तेवढ्यात टि.व्ही वर एक बातमी झळकली. *नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातील निमगूळ येथे बस आणि कंटेनर मध्ये धडक* . ज्यात ड्रायव्हरसह तेरा ते चौदा लोकांचा मृत्यु झाला असं म्हणत होते. माझं लक्ष आपोआपच तिकडे वेधलं गेलं.
टी. व्ही वर दाखवण्यात येत असलेल्या चित्रफितीमध्ये औरंगाबाद-शहादा बसची पाटी पडलेली होती. ज्यावर रक्ताचे डाग स्पष्टपणे दिसत होते. निम्म्यापेक्षा जास्त बसचा भाग कंटेनरमध्ये घुसला होता. समोरचं चित्र अगदी विदारक दिसत होतं. बातमी पाहून सुन्न झालो. ती रक्ताने माखलेली पाटी जणू हेच सांगत होती. वेगाची नशा करू नका. कारण वेग फक्त रक्ताची नशा करत असतो.
पाटी आणि मृत झालेल्यांची स्थिती पाहून मला त्या आईची आठवण झाली. जीने कामावर जाणा-या मुलाला काळजीपूर्वक जायला सांगीतले होते. तसंच त्या मृतांच्या आईनेही त्यांना काळजीपूर्वक प्रवास करायला सांगितलं असेल. तिनेही त्यांना पाठवतांना देवाचं नामस्मरण केलं असेल. आणि त्यांनीही आईला तसाच होकार दिला असेल. पण रस्त्यावरच्या वेगाने त्यांचा तो होकार खोटा ठरवला होता. त्यांनी दिलेले सुखरूप पोहोचायचे आश्वासन फोल ठरले होते. त्या आईची काळजी कधीच अश्रूमध्ये रुपांतरीत झाली होती.
मामांची मुलगी ते समोरील दृश्य पाहून घाबरली होती. तिच्याही उदरात एक प्राण वेगाने वाढत होता. काही दिवसांनी त्यालाही जगाच्या या शर्यतीत पळायचे होते.तो कसं हे सगळं सहन करेल. याच विचाराने कदाचित ती हादरली असणार. ती अगदी अधीर होऊन मला म्हटली. “कसं काय चालवतात हे गाड्या काय माहीत. एका क्षणांत एवढ्या लोकांना संपवून टाकले. दैव असं का सूड घेत कोणास ठाऊक. काय चुक होती त्या प्रवाशांची. ड्रायव्हरच्या चुकीमुळे एवढ्या लोकांनी जीव गमवावा लागला” तीच्या या निरागस प्रश्नात मला एका आईची काळजी जाणवली. मी तीला म्हटलं “इथं ना बस ड्रायव्हरची चुकी आहे ना कंटेनरच्या ड्रायव्हरची. इथं चुकी फक्त माणसाची आहे. ते रस्ते माणसाने बनवले. ती बस आणि कंटेनर माणसानेच बनवले. त्यांना वेगही माणसानेच दिला. माणुसच त्या गाड्या वेगाने चालवत होता. आणि त्यात मेलाही माणूसच.त्यात दैव ते काय करणार?” माझ्या ये उत्तराने ती समाधानी झाली की नाही मला माहीत नाही. पण तिच्या चेह-यावरचे भाव सांगत होते. कि माणसाने सुरू केलेली ही जीवानाची शर्यत त्याच्या जीवनासोबतच संपून जाते. आणि रक्ताने माखलेली ती नाही त्याच्या कधीतरी होण्याची ग्वाही देत पडून राहते. रस्त्यावर……..
© कपिल साहेबराव इंदवे
मा. मोहीदा त श ता. शहादा
जि. नंदुरबार
मो 9168471113