सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 154
☆ चिरदाह… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
ती अभिसारिकाच असते,
युगानुयुगे…
आणि तो भेटतोच
प्रत्येक जन्मी
आयुष्यात कुठल्या
तरी वळणावर ,
बकुळ फुलासारख्या,
वेचाव्या लागतात
त्या वेळा,
मोसम येईल तशा….
तसे नसतेच काही नाव..
या नात्याला…
नसतेच वयाचे वा
काळाचे बंधन….
मनात कोसळत रहातो
बेमोसम पाऊस,
अविरत….अखंड…
ओल्याचिंब दिवसातही
जाळतच राहतो,
अभिसारिकेला..
एक अनामिक
चिरदाह …
जन्म जन्मांतरीचा!!
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈