मराठी साहित्य – मराठी कविता – * पुन्हा प्रश्न तेच * – सुश्री विजया देव

सुश्री विजया देव

पुन्हा प्रश्न तेच

(सुश्री विजया देव जी का e-abhivyakti में स्वागत है। प्रस्तुत है उनकी एक भावप्रवण कविता।)

पुन्हा पुन्हा पावलाना
लागतेच ठेच
नवी नवी संकटे
नवे नवे पेच
विसावा मनाला द्यावा जरासा
दत्त म्हणुनी ठाकती
पुन्हा प्रश्न तेच
साैख्य आहे दाराशी
पाेटभर अन्न
तरीही कां भासते
पाेट रिकामेच
कशासाठी  हा प्रवास
चालताे आहे
ध्येय काेणतेच नाही
जिवन जुनेच
सारे जगुनिया झाले
नाही आस काेणती
सुखाने हा जीव जावा
मागणे एवढेच
©  विजया देव