सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 168 ?

☆ माझे जीवन आधार ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आई आणखी वडील

शैशवी जीवनाधार

लाभणे प्रौढत्वातही

भाग्यच अपरंपार!

वडील होते पाटील

 दरारा गावात फार

आईही वाघीण माझी

शब्दा तिच्या अति धार !

शुभ्र वस्त्रातील तात

आठवती  वारंवार,

पुष्कराज,पाचू हाती

अंगठ्या सोन्याच्या चार

आई चांदणी शुक्राची

सोन्यात साजिरी दिसे

चंदेरी डाळिंबी साडी

  झंपर हिरवे असे !

ऐश्वर्याचा काळ गोठे

अवचित एकाएकी

शब्दच नाही वर्णाया

नसे मुळी फुशारकी !

शापित कुणी गंधर्व

आणि अस्वस्थ आत्मा ती

” हंसोका जोडा” बिछडे

काळ रडे का एकांती!

 असा नियतीचा डाव

जगणे झाले अंगार

 सदैव होते ते दोघे

माझे जीवन आधार!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments