सौ.वनिता संभाजी जांगळे
अल्प परिचय:
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये भाग घ्यायला आवडते.
प्रकाशित साहित्य :
काव्य संग्रह – १ मनातलं काही २ माझी कविता ३ शब्दधारा
कवितेचा उत्सव
☆ स्मृतीगंध… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆
☆
नव्या उमलत्या कळ्यांचा
तू माळतेस केसात गजरा
गुलाबी थंडीतल्या धुक्याचा
शेला लपवितो चेहरा
☆
अंगणात टाकिल्या सड्याला
गंध ओल्या स्मृतितला
चाहुलीने सोनकिरणांच्या
रंग उजळला रांगोळीतला
☆
गोंगाट मनात दाटला
तुझ्या वेड्या आठवांचा
मनोमनी खुलून राहिला
रंग रातीच्या चांदण्यातला
☆
© सौ.वनिता संभाजी जांगळे
जांभुळवाडी-पेठ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈