सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 169
☆ विसावा ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
कोठे तरी जिवाला
लाभो जरा विसावा
करतेय ईश्वराचा
सर्वस्वी हाच धावा
संसार मांडला का
माझे मला कळेना
तारूण्य काय असते
तेव्हा कळले मुळीना
प्रवाहपतिता परि हे
आयुष्य पार पडले
जे नको घडाया ते
अवचित येथे घडले
जगरहाटीच असते ?
होते प्रारब्ध हेच?
गा-या भिंगो-या की
नाच गं घुमा नाचच ??
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈