सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 173
गझल… सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
या निशेचा नशिला नूर आहे
पण मनी कसले काहूर आहे
☆
सांग मी आता जाणार कोठे
गाव हे परके, मगरूर आहे
☆
साहवेना जगणे अन मरणही
शाप हा इतका भरपूर आहे
☆
घेतला “काव्य वसा” वेदनेचा
डंख जहरी मज मंजूर आहे
☆
ध्वस्त झाली जिवनाचीच नौका
सागरा ने ,मी आतूर आहे
☆
कृष्ण राधेला बोले, मृगाक्षी,
ज्योत तू अन मी कापूर आहे
☆
गीत हृदयीचे झंकारताना
आर्ततेचाच ‘प्रभा ‘ सूर आहे
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈