सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 177
बाई…
सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
काहीतरी या मनात
सदा आहेच सलते
दु:ख कोणते सदैव
बाई आहेच दळते
बाईपण सोसू कसे
चिंता अखंड करते
शैशवात फुलताना
काट्यावर ती वसते
आई म्हणाली हळूच
कानी तेराव्याच वर्षी
“मोठी झालीस तू आता”
नको जाऊस दाराशी
आत कोंडले स्वतःस
नाही दारापाशी गेली
रूप ऐन्यात पाहून
स्वतः वरती भाळली
बाई आहे म्हणताना
जीणे अन्यायाचे आले
अशा त-हेने जगता
ओझे आयुष्याचे झाले
☆
© प्रभा सोनवणे
१६ मार्च २०२३
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈