सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 184
🌸 मर्मबंधातली ठेव ही… 🌸 सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
तुला पाहिलं एका कार्यक्रमात,
त्याच्या बरोबरच!
प्रेमलग्न का ?
विचारलं त्याला—
तसं छानसं हसून,
‘हो’ म्हणाला !
खूप छान वाटली,
तुमची जोडी!
नंतर….
कुठल्याशा लग्नात…
छान सजलेली तू …
एखाद्या स्वप्नसुंदरी…सारखीच !
तू असायचीच त्याच्याबरोबर,
असलीस, नसलीस तरीही…
अपूर्णच दोघे,
एकमेकांशिवाय!
“मेड फॉर
इच अदर”
अशीच जोडी ‐—-
तरीही–
दोघांचं स्वतंत्र अस्तित्व!
तुझ्या कसोटीच्या
क्षणीही,
त्यानं तुला असं हळूवार
जपताना पाहून ,
जाणवून जातं,
नुसतीच तनामनाची,
नाती नसतातच ही…
नजरच सांगून जाते…
प्राण ओतलेला असतो
एकमेकांत!
तुमच्या दोघांविषयी वाटणारं,
जे काही…दुसरं -तिसरं ,
काही नाही …
ही ठेव मर्मबंधातली !
© प्रभा सोनवणे
२५ मे २०२३
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈