सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 188 ?

सांजवेळी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आयुष्याच्या सांजवेळी,

आठवत राहतात….

काही फुलपंखी क्षण…

मनःपूत जगलेले!

 

आयुष्याला पडलेली,

सुंदर स्वप्नंच असतात ती,

कधीकाळी पाहिलेली…

काळजात खोलवर जपून ठेवलेली !

 

ती नाकारता येत नाहीत,

आणि इतर कोणाशी,

शेअर ही करता येत नाही,

आपला शाश्वत इतिहास..

 

म्हणूनच स्वतःशीच,

करतो उजळणी आपण,

कारण अगदी “हमराज”

असणारेही असतात अनभिज्ञ,

आपल्या मानसिकते पासून!

 

ते स्वतःच्या इतिहासापासूनही,

नामानिराळे!

नाकारतात स्वतःचा भूतकाळ,

अगदी निकराने !

कदाचित तेच अधिक सोयीस्कर,

वाटत असावे त्यांना !

 

पण एखाद्याचा स्वभाव असतो,

अधिकाधिक गुंतण्याचा,

गुंतून पडण्याचा !

 

केवढा मोठा कालखंड,

तेवीस चोवीस वर्षाचा….

निरंतर मनात रूंजी घालत असलेला !

 

पण नाही देता येत,

“ओ ” त्या हाकेला….

किंवा या हळव्या निमंत्रणाचा,

नाहीच करता येत स्वीकार!

 

म्हणून घालूनच घ्यावं,

एक कुंपण स्वतःभोवती !

आणि लागूही देऊ नये “भनक”

कुणालाच त्या कासाविशीची !!

– २६ जून २०२३

 

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments