सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 189
☆ चिंब पाऊस… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
बाहेर चिंब पाऊस,
आणि मनात
आठवणींचे ढग,
काळजातली,
घुसमट वाढली,
अन् डोळे…
बरसू लागले,
झरझर !
प्रश्न असंख्य…
उत्तर नाहीच
सापडत!
नीती अनितीच्या
पल्याड…
एक गाव असतं!
कृष्णडोहाशी,
संतत धार पाऊस,
आणि युगायुगांची
तहान…
शुष्क…कोरडीच !!!
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈