सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 202
☆ दुधावरची साय ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
भाद्रपदातली एक प्रसन्न सकाळ…
गर्भार सुनेला
इस्पितळात घेऊन जाताना
मनाची उलघाल…..
मनोमन ईश्वराची आराधना,
ईशस्तवन!
प्रसुतीगृहाच्या दारातला प्राजक्त,
मन मोहविणारा!
येणा-या सुगंधी क्षणांचा
साक्षीदारच जणू!
प्रतिक्षा….वेणा….वेदना….
सारं शब्दातीत….
पदरात पडलेलं निसर्गाचं दान अमूल्य !
टॅ हॅ ऽऽऽटॅ हॅ ऽऽऽ चा प्रथम स्वर
जिवाचा कान करून ऐकलेला !
आजीपणाची कृतार्थ जाणीव…..
सा-या भूमिका पार पाडून,
येऊन पोहचलोच आपण,
या ठिकाणी!
कसं अन काय…
दुधावरची साय…
इवलासा जीव कवेतलं आकाश…
हृदयातला अथांग अर्णव…
आयुष्याची सार्थकता….जगण्याचा अर्थ नवा !
☆
© प्रभा सोनवणे
१४ सप्टेंबर २००८
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈