सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 205
☆ तगमग ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
घराचे दार बंद,
काही बंधने तिनेच
घालून घेतलेली !
पण खिडक्यांना कळते ,
तिला काय हवे आहे ,
मग त्या पोहचवतात,
तिला हवा तेवढा प्रकाश
आणि ती उजळून निघते !
व्यक्त होत रहाते
इथे तिथे !
तशी ती मुक्तच आहे ,
तिने मिळवले मूठभर स्वातंत्र्य,
पण मानसिक गुलामगिरीचे काय?
आणि आमंत्रण न देता
तिच्या पर्यंत येणाऱ्या ,
त्या प्रकाशाचे तरी काय?
ही तगमग तिची तिनेच
पाळलेली ,
आजीवन!!
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈