सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 214 ?

आम्ही लेकी सावित्रीच्या ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

पाटी पेन्सील बाई च्या हाती?

ढोल ,ढोर आणखीन नारी,

बडविण्यात गेली जिंदगी

केली कुणी विलक्षण क्रांती?

*

हाती आली आई सरस्वती

उद्धारण्या ज्योतीबा सावित्री

उपकार त्यांचे मानू किती ?

संथ आयुष्या आली की गती !

*

शेण झेलले अंगावरती,

कर्मठांनी छळलेच अती

ताठ कण्याने उभी ठाकली

आणि उजळल्या लाखो ज्योती !

*

 आई सावित्री माझी जननी,

महिमा तिचा वर्णावा किती?

बाईपणाची घालवली भीती

केले बाईला कर्ती-सवर्ती !

*

भाग्य पालटे,एका विद्येने,

आता सन्मानाने मिरवती

सुवर्णासम लखलखती

सावित्रीच्या लेकी भाग्यवती !!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments