सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 216 ?

माझी लेक ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

माझ्या लेकीचे दिसणे

आणि निखळ हसणे

कुणी दृष्ट नका लावू

कुशीतले हे चांदणे !

*

आले आभाळच हाती

मिळविले  चंद्र तारे

कुस माझी उजवली

सुख मिळाले की सारे !

*

नीट वाढवीन तिला

जपणूक ,निगराणी

झुला हाताचा करून

माझी सांगेन कहाणी!

*

माझ्या मनीचे गुपीत

फक्त तिलाच कळेल

आणि बाईच्या जातीला

नवे क्षितिज मिळेल!

*

नसे अंधाराची भीती

लेक माझी तेजस्विनी

घडविन तिला मी गं

तळपती सौदामिनी!

© प्रभा सोनवणे

 २४ जानेवारी २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments