सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 222
☆ होळी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
भंगार जाळण्याला येतेच नित्य होळी
मारून बोंब आता होईल व्रात्य होळी
*
मोहात पौर्णिमेच्या असतेच चांदणेही
चंद्रास काय ठावे दावेल सत्य होळी
*
जाळात टाकलेले, वाईट – वाकडेही
पेटून पाहते ते प्रत्येक कृत्य होळी
*
भरपूर घातलेले पोळीत पुरण आता
दारात पेटते पण करते अगत्य होळी
*
आता “प्रभा”स कोणी शिकवू नका हुषारी
खेळून रंग सारे पेटेल अंत्य होळी
☆
© प्रभा सोनवणे
१९ मार्च २०२४
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈