मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ असीम बलिदान ‘पोलीस’ ☆ – श्री संतोष ज्ञानेश्वर भुमकर
श्री संतोष ज्ञानेश्वर भुमकर
कोणी आले पोटासाठी कोणी आले प्रेमासाठी,
कोणी कुटुब जगविण्यासाठी तर कोणी देशभक्तीसाठी.
नऊ महीने पोटात वाढला, नऊ महीने मैदानात झिजला,
खडतर प्रशिक्षण पुर्ण करुनी तो झुजण्या पोलीस झाला.
जनसेवाची नशाच चढली आठवण कुटुबाची मनातच विरली.
कधीखुन कधीदरोडा तर कधी दगलीत दगड अंगावर आली.
भिती त्याच्या ना डोळ्यात ना मनात कर्तव्यतही ना दिसली.
करीता तपास त्याची लेखनी अन काया नाही कधी दमली.
चौकीलाच घर माने जनतेतच मायबापाचा शोध असे डोळी.
मुला बाळाची आठवण येता ना आश्रु ढाळी आनंदानी गिळी.
पत्नीच्या विरहात जरी त्याची जात असे रोजच रात्र काळी.
तरीही जोमाने कार्यास लागे रविच्या साक्षीने रोज सकाळी.
तो यंत्र आहे का देव कसला हा अजब मानव प्रश्न मज पडे
कीती प्रकारची कामे करती त्याचे मोजमाप नाही कोणाकडे.
करता तपास रात्रदिनी कोणी बंदोबस्तात सदैव असते व्यस्त.
कोणी नक्षल्याची झुजते त्याच्या कामाला कधीच नाही अस्त.
कोणी जखमी दगड फेकीत कोणी अतंकवाद्याच्या गोळ्यात,
कोणी भुसुरुगात गेले गाडुन कोणी नक्षल्याच्या चकमकीत,
तरीही त्याची माघार नसे कर्तव्यत दुःख लपवत अश्रु गिळत,
जनतेसाठी भावनांचे बलिदान देत आनंदाने होतो तो शहीद.
ज्यांच्या बलिदानावर कुटुब आपले सुरक्षित आम्ही जगतो.
त्याच्याच त्यागाच्या अश्रुवर आम्ही सणवार साजरे करतो.
आपण मात्र सुखात आपल्या ते बलिदान क्षणात विसरतो.
तो मात्र हा विचार नकरता विरहातही कार्यतत्परतेने करतो.
राज्या राखीव बल असो वा गडचिरोलीचा जहाबाज पोलीस.
मुबईचा असो वा रेल्वे, ग्रामीण, माझा महाराष्ट्रचा तो पोलीस.
प्रत्येकाचे आहे बलिदान मोठे, आम्हासाठी दुसरा पर्याय कुठे,
‘सदरक्षणाय खल निग्रहनाय’ हे ब्रीद त्याचे आचारातही वठे
क्षणा क्षणाला मी त्याचे हे बलीदान खाकीत स्वताही स्मरतो.
खाकीलाच शान मानतो जनतेसाठी, तिरंग्यासाठी जीव देतो.
माझा असे त्रिवार मुजरा धन्यावाद त्याचे व देवाचे मानतो.
या जन्मी मला तु केला पोलिस पुढिल जन्माची वाट पाहतो.
© संतोष ज्ञानेश्वर भुमकर.
पोमके सावरगाव.