सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 238 ?

निषेध… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आपण माणसंच असतो,

मुळीच नसतो साधुसंत,

पण आपल्या जगण्याची

निश्चितच असते एक पद्धत!

  बरेच दिवस चालत राहतो,

मेंढरांप्रमाणे किंवा,

जगत असतो–

प्रवाहपतित होऊन!

 पण स्वतःला सजग नागरिक

म्हणवून घेताना ,

तुम्ही काय काय खपवून घेता ?

 शाळेत सुपरव्हिजन करताना,

तुम्ही करू देता विद्यार्थ्यांना कॉपी?

जाऊ दे बिचारा पास तरी होईल,

या उदात्त हेतूने ?

की एखाद्या बालिकेवर,

बलात्कार करणाऱ्या विषयी,

येऊ शकते तुमच्या मनात कणव ?

आपण नसतोच “सत्यकाम” सिनेमाचे नायक !

किंवा हरिश्चंद्राचे अवतारही ,

पण कोणते कसदार आणि,

कोणते हिणकस,

हे निश्चितच कळते आपल्याला !

आपण बदलू शकत नाही

कुठलीही यंत्रणा किंवा

व्यवस्थाही !

आपण हतबलच असतो,

बऱ्याचदा!

पण आपण निश्चितच नोंदवू

शकतो निषेध,

कुठल्याही दुष्कृत्याचा !

आपला कुठलाही ,

फायदा नसला तरी  !

☆  

© प्रभा सोनवणे

२५ जानेवारी २००७

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments