मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ पाऊस धारा☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(प्रस्तुत है श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की एक अत्यंत भावप्रवण कविता ☆ पाऊस धारा☆। )
कधी रिमझिम पाऊस धारा
कधी टपटप नाचती गारा
कोंब फुटतील असे तरांरा
अंगावरती जणू शहारा
आनंदुन हे मोर नाचती
फुलून गेला नवा पिसारा
नजर ना लागो या शिवारा
कणीसभर तो मोतीचारा
पक्षी घिरट्या घालत आले
गोफण हाती खडा पहारा
पक्षांची या चिवचिव दारा
आसमंत हा भरेल सारा
या धरतीने त्या गगनाने
कशा छेडिल्या सप्तक तारा
© अशोक भांबुरे, धनकवडी, पुणे.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८