सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 251
☆ मन माझे… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
(साभार – अभिमानश्री दिवाळी अंक-१९९४ – संपादिका – सुश्री प्रभा सोनवणे)
☆
मन माझे आताशा—
थाऱ्यावर रहात नाही,
मन पंख पसरून बाई
वाऱ्यावर वहात जाई !
*
मन जाते इकडे तिकडे
ओलांडून सारी कवाडे!
*
मन सूर्यापाशी जाते
किरणांनी तेजाळते !
*
निशेच्या शशिकिरणाची
शीतलता अनुभवते!
*
हिरवळीवर हिरवळते मन
बकुळीवर दरवळते मन!
*
मन जाते दूर दूर
मज लावते हुरहूर !
*
मन राधेपाशी जाते
कृष्णाची गाणी गाते!
*
मन माझे गोकुळ होते
अन् प्रीतीस्तव व्याकुळते!
*
मन तुळशीपाशी येते
होऊन सांजवात
मन वृंदावनी जळते !
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈