सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 254
☆ वाटा… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
नकळतच आठवते….
आयुष्यात घडून गेलेली घटना,
या घटनेचा,
त्या घटनेशी काही संबंध ?
खरंतर नसतोच,
पण वाटतं उगाचच,
त्यावेळेस ही असंच घडलं होतं….
आपले आनंद,
शोधतच असतो की आपण,
फक्त वाटा बदलत
असतात!
एखादी वाट नसतेच रूचत,
तरीही पुन्हा पुन्हा,
त्या वाटेवरून जाणं,
नाही टाळता येत!
हा चकवा नसतोच,
वाटा अगदी स्वच्छ दिसतात,
पण चुकतोच वाट,
आणि घुटमळत राहतो
तिथल्या तिथे ,
इहलोकीचा प्रवास संपेपर्यंत!
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈