सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 260
☆ कोण… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
कुसुम, कोमल,
कामिनी कुंजवनीची,
कौतुक करावे किती,
कलिका कुजबुजती!
कादंबिनी,
कोकिळ कूजती !
काननी केवडा,
केतकी, कुंद कोमेजती!
कल्पना कृतीत,
कविता, कादंबरी!
कुठली कस्तुरी ??
कार्तिकातली कुमुदिनी!!
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈