सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 268
☆ माफ़ी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
(अल्पाक्षरी)
☆
आपण केलेल्या प्रत्येक चुकीची,
माफी कुणाकडे मागणार?
Confession Box जवळ जाऊन बोलायची गोष्ट—–
म्हणजे पापांगिकार !
अनेक गोष्टीत
दिसत असतात चुका,
स्वतःच्या आणि इतरांच्या ही,
आपण मुळीच नसतो,
हरिश्चंद्राचे अवतार किंवा,
साधू संत ही ! तरीही—-
आपल्याला जगायचेच असते,
स्वच्छ, पापभिरू बनून!
पण कसले ,कसले मोह,
भाग पाडतात पाप करायला!
कुठंतरी वाचलं होतं,
“नैतिक अनैतिक म्हणजे काय?
जे मनाला आनंद देतं….
ते नैतिक आणि जे मनाला दुःख देतं ते अनैतिक!”
तू ही म्हणालास,
ख्रिस्ती धर्मात ज्या Ten commandments सांगितल्या आहेत,
त्यात अकरावी अशी आहे,
(ही आज्ञा मानवनिर्मित )- —
“ह्यातलं जर काही तुम्ही केलंत,
तर ते कुणाला सांगू नका !”
पण न सांगितल्यानं पाप लपत नाही रे ,
डाचत राहतं मनात!
म्हणूनच मागायलाच हवी माफी,
आपल्या आत्म्याला खटकणाऱ्या–‐
प्रत्येक गोष्टीची,
ईश्वराकडे!
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈