मराठी साहित्य – मराठी कविता – ? गुलमोहर ? – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

 

? गुलमोहर ?

 

(सुश्री ज्योति हसबनीस जी का पुष्पों एवं प्रकृति के प्रति अपार स्नेह की साक्षी है यह सामयिक कविता। गुलमोहर,  ग्रीष्म ऋतु, पक्षी, पेड़ और पथ; कुछ भी तो नहीं छूटा।  इसके पूर्व हमने सुश्री ज्योति जी की कदंब के फूल पर एक कविता प्रकाशित की थी जिसे पाठको का अपार स्नेह प्राप्त हुआ था। )

 

ऐन ग्रीष्मातील वैशाख वणवा,

तप्त ऊन्हातील दग्ध जाणीवा ।

ओसाड निर्जन रस्ते सारे ,

घरट्यात व्याकुळ पक्षी बिचारे ।

 

अशाच उजाड वळणावरती ,

केशरी छत्र उभारून धरतीवरती ,

होरपळ मिरवीत अंगावरती ,

गुलमोहर उभा निःशब्द एकांती।

 

 

केशर तांबडी पखरण याची ,

करी भलावण सकल पक्ष्यांची ।

गर्द ,विस्तृत छाया त्याची ,

करी शीतल काया पांथस्थांची ।

 

छायेत केशरी या छत्राच्या ,

फुलती मनोरम  प्रीतीचे मळे ,

संगतीत तांबट फुलांच्या ,

रंगून जाती जीव खुळे ।

 

बघूनी दिमाख गुलमोहराचा ,

वैशाख वणवा विझून जाई ।

ऐन ग्रीष्मातील रुबाब त्याचा ,

प्रीतीची मोहोर ऊमटवून जाई ।

 

©  सौ. ज्योति हसबनीस