मराठी साहित्य – मराठी कविता – ? दवाचा मोती ? – –श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 ☆ दवाचा मोती ☆
(प्रस्तुत है श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की एक बेहतरीन गजल। एक वरिष्ठ मराठी साहित्यकार की कलम से लिखी गई गमगीन गजल से निःशब्द हूँ।)
दीप लावू मी कशाला
सूर्य माझ्या सोबतीला
मी वडाचे झाड झालो
थांब माझ्या सावलीला
या रुपेरी तारकांचे
गुच्छ येती अंबराला
चांदण्यांची बाग माझी
मी भुलावे पौर्णिमेला
तू रुपेरी वस्त्र ल्याली
वर्ख जैसा लावलेला
बोलते भू या तरूला
जन्म द्यावा अंकुराला
या दवाचा मोती व्हावा
वाटते हे शिंपल्याला
© अशोक भांबुरे, धनकवडी
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८