मराठी साहित्य – मराठी कविता – ? गझल ? – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

? गझल ?

(सुश्री प्रभा सोनवणे जी  हमारी  पीढ़ी की एक वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं ।   प्रस्तुत है सुश्री प्रभा जी की एक भावप्रवण मराठी गजल।)

फुका शोध घेशी, तुला ज्ञात आहे
तुझा आप्त कोणी न शहरात आहे
कधी ना मिळाली कुणाची दीदारी
सदा वैर माझ्याच नशिबात आहे
दिवा एक नाही कुणी लावणारा
इथे फक्त अंधारली रात आहे
कुणी भाव खातो फुकाचा इथेही
मला माहिती, काय औकात आहे
व्यथा साहते मी मुक्याने तरीही
कुणा वाटते मारवा गात आहे

© प्रभा सोनवणे,  

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११

मोबाईल-9270729503