मराठी साहित्य – मराठी कविता – * आणि वसंत आला * – सुश्री मीनाक्षी भालेराव

सुश्री मीनाक्षी भालेराव 

आणि वसंत आला

(सुश्री मीनाक्षी भालेराव जी की जीवन के कटु सत्य को उजागर करती हृदयस्पर्शी कविता निश्चित ही आपके नेत्र नम कर देगी।)

अकराव्या वर्षी लग्न झालं
आणि तेरा वर्षाच्या आत
मुलं झाले |
एक मुलगा अणी दोन मूली
सगळे घरचे काम,
मुलं -बाळांची देख रेख
नणंद-देवर पण लहानच होते,
सासू- सासऱ्यांची ची देख रेख
एवढ्यामध्ये कमावणारी एक व्यक्ति म्हणजे ” हे ” |
कधी कधी तर महीने, वर्ष सहजच
निघून जायचे  |
नीट सजायला पण वेळ नाही भेटायचं
नाही ह्यांच्याशी बोलायला वेळ असायचा |
सर्व त्यांच्या मार्गावर लागले तेव्हा मात्र
मूला-बाळांचे अभ्यास
त्यांच्या भविष्याच्या पायऱ्यांची चिंता भासू लागली|
हळू हळू मुलंही आपल्या मार्गी लागले
तेव्हा परन्तु साठी आली |
आता आमच्याकडे कोणीच नाही
आम्ही दोघे म्हातारे म्हातारी राहिलॊ |
माहिती नाही कस काय
माझी नटायची इच्छा झाली |
इतक्या वर्षात आम्हाला दोघांना
एक दुसऱ्याला बघायला
स्तुती करायला
वेळच भेटला नाही |
मनात विचार आला
आज ह्यांचे फिरून होण्या अगोदर
जरा आवरून घेऊया |
जसे जसे आवरत गेली
मन दडपून गेले ।
ह्यांनी दाराची बेल वाजवली
तशी माझ्या ह्रदया ची गती
थांबायलाच तैयार नव्हती |
जीव मुठीत घेऊन दार उघडला
दार उघड़ल्यावर हे बोलले
क्षमा करा चुकीच्या घरात आलो |
मी म्हणाली “ अहो ”,
ते आश्चर्याने मला
बघायला लागले
आणि बोलले
“अग ही तू, तू किती सुंदर आहेस
इतके वर्ष तूला मी नीट पाहिलही नाही ! ”
किती तरी वेळ
माझा हात धरून
बघत राहीले |
त्यांच्या हाताची उष्णता
अणी डोळ्यांचे उमडलेलं प्रेम पाहुन
खरं सांगते
अर्थात
आज आमच्या आयुष्यातला पहिला
वसंत आला ।
© मीनाक्षी भालेराव, पुणे