कविराज विजय यशवंत सातपुते
(प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी द्वारा रचित कविता ‘पेरणी’ अथवा ‘बुवाई’ खेती की एक महत्वपूर्ण प्रक्रिया है। कविराज विजय जी जमीन से जुड़े व्यक्ति हैं और ऐसे कृषिप्रधान विषय पर उनकी लेखनी से रचित ऐसी कविता में हम मिट्टी की सौंधी खुशबू पाते हैं। निःसन्देह आपको भी यह कविता बहुत अच्छी लगेगी।)
☆ पेरणी ☆
बळीराजा वावरात
करी बीजाची पेरणी
आयुष्याची नांगरणी
सरीतून. . . . !
पावसाच्या सरीतून
मिळे जीवन धरेला
जीव पेरणीला
लागतसे .. . . . !
पावश्याच्या हाळीसवे
शिरे नांगर मातीत
सुखाच्या भेटीत
नांगरणी. . . !
पावसाची सर
देई आनंदाची बात
पेरणीचा हात
फिरताना. . . . !
पावसाची साथ
आहे पेरणीचा दुवा
अलंकार नवा
पेरणीत.. . . !
पेरणीत राजा
त्याचे पेरीतो जीवन
दुबार पेरण
कष्टदायी.. . . . !
शेत मळ्यातून
उद्या उगवेल धान
सुगीचेच वाण
पेरणीत . . . . !
© विजय यशवंत सातपुते
100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर 2, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 9371319798.